मराठी अभिनेत्री धनश्री भालेकर यांना एका वेब मालिकेत काम देतो असे सांगून त्यांच्याकडून २२ हजार ३६८ रुपये उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे शीव आणि अनिकेत या दोघांविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर अभिनेत्यांची अशाप्रकारे फसवणूक होऊ नये म्हणून धनश्री यांनी फसवणूक झाल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

कळवा येथे धनश्री त्यांच्या कुटुंबियांसह राहतात. गेल्या सात ते आठ वर्षांपासून त्या चित्रपटसृष्टीत कार्यरत असून त्यांनी विविध मराठी मालिका आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. ८ डिसेंबर २०२१ मध्ये त्यांना एक ई-मेल आला. हा ई-मेल एका नामांकित निर्माता कंपनीच्या नावाने होता. मेल पाठविणाऱ्या व्यक्तिने त्याचे नाव अनिकेत असल्याचे सांगून तो या कंपनीमध्ये दिग्दर्शक म्हणून काम करत असल्याचे भासविले. तसेच धनश्री यांना त्यांची निवड एका वेब मालिकेत करण्यात आल्याचे या मेलमध्ये म्हटले होते. नामांकित निर्माता कंपनीसोबत काम करण्यास मिळत असल्याने धनश्री यांनीही काम करण्यास होकार दर्शविला. त्यानंतर अनिकेतने त्यांना व्हॉटसॲपवर संपर्क साधून पुढील प्रक्रियेसाठी कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात बोलविण्यात येईल असा निरोप दिला.

Raja Ranichi Ga Jodi fame actor Sanket Khedkar new serial Jai Jai ShaniDev coming soon
Video: ‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्याची येतेय नवी मालिका; शनिदेवावर आहे आधारित, पाहा जबरदस्त प्रोमो
muramba fame shivani mundhekar and nishani borule meet indian captain rohit sharma
भारतीय कर्णधार रोहित शर्माला भेटल्या ‘मुरांबा’ फेम रमा अन् रेवा, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंबरोबरचे फोटो व्हायरल
Saranya Ponvannan
पार्किंगच्या जागेवरून वाद अन् थेट जीवे मारण्याची धमकी, प्रसिद्ध अभिनेत्रीविरोधात शेजारणीने पोलिसांत दिली तक्रार
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

काही दिवसांनी अनिकेतने धनश्री यांना संपर्क साधून करोनाच्या प्रादुर्भावामुळे मालिका चित्रीकरणाच्या तारखा पुढे ढकलल्याचे कळविले. तसेच पुन्हा कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी हैदराबाद येथील कार्यालयात जावे लागेल असा निरोप त्याने दिला. त्यानंतर १ फेब्रुवारीला धनश्री यांना अचानक शीव नावाच्या एका व्यक्तीने मोबाईलद्वारे संपर्क साधून त्याची ओळख कंपनीचा कार्यकारी निर्माता म्हणून करून दिली. तुम्ही हैदराबाद येथील कंपनीच्या कार्यालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यास या, तसेच विमान प्रवासाचे तिकीट नोंदविताना एक विशिष्ट परवलीचा शब्द वापरण्यासही त्याने सांगितले. त्यानुसार धनश्री यांनी त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याचे १० फेब्रुवारीचे रात्रीचे विमान तिकीट मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या परवलीच्या शब्दाद्वारे तिकीटाची नोंद होत नव्हती. याची माहिती धनश्री यांनी शीवला दिली. त्यानंतर शीवने त्यांना एक क्रमांक दिला. त्या क्रमांकावर विमान प्रवासाचे पैसे भरण्यास विमानाचे तिकीट नोंद होईल असे त्याने सांगितले. धनश्री यांनी तात्काळ विमान प्रवासाचे २२ हजार ३६८ रुपये त्या खात्यात ऑनलाईन आर्थिक व्यवहाराद्वारे जमा केले. परंतु त्यानंतरही विमान तिकीट त्यांना मिळाले नव्हते.

धनश्री यांनी अनेकदा शीव आणि अनिकेत यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून धनश्री यांना कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे कळवा पोलीस ठाण्यात शीव आणि अनिकेत नावाच्या व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास कळवा पोलिसांकडून सुरू असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.