अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी धुमाळ हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. हेमांगी अनेकदा सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती तिचे अनेक फोटो आणि धमाल व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. नुकतंच हेमांगी कवी हिने कामामुळे आलेल्या तणावाबद्दल भाष्य केले आहे. यासोबत तिने झोप किती महत्वाची आहे हे देखील सांगितले आहे.

हेमांगी कवी हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत तिने दोन फोटोही शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत एका प्लेटमध्ये फुलं पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या फोटोत हेमांगी ही गोड हसताना दिसत असून तिने केसात त्यातीलच एक फूल माळलं आहे.

marathi actress Amruta Subhash and sandesh kulkarni Love story Entdc
पहिल्या भेटीतलं प्रेम, १७व्या वर्षी लग्नाची मागणी अन् मूल होऊ न देण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची फिल्मी लव्हस्टोरी
do-you-know-who-is-this actress
फोटोमध्ये पाठमोऱ्या उभ्या असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का? मराठीबरोबर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही कमावतेय नाव
Taapsee Pannu reacts on wedding with Mathias Boe
तापसी पन्नू विदेशी बॉयफ्रेंडशी मार्चमध्ये लग्न करणार? अभिनेत्रीने चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”
aamir-khan2
ठरलं! ‘या’ चित्रपटातून आमिर खान करणार दमदार कमबॅक; प्रदर्शनाबद्दल मिस्टर परफेक्शनिस्टचा खुलासा

“आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही”, अभिनेत्री हेमांगी कवीची पोस्ट व्हायरल

या फोटोला कॅप्शन देताना ती म्हणाली, “बऱ्याच दिवसांपासून कामानिमित्त बरीच धावपळ, प्रवास चालू होता, झोपेचं खोबरं झालं होतं. काल लवकर pack up झाल्यामुळे व्यवस्थित झोपायला मिळालं आणि मी ही घोडे बेचके झोपून गेले 16 तास. झोपेचा backlog भरून काढल्यासारखं झालं.

आज उठल्यावर इतकं कमाल वाटत होतं. मन, डोकं सगळं थाऱ्यावर असल्यासारखं. Energy revive झाली आणि कोऱ्या पाटीने पुन्हा कामाला सुरुवात. आपल्या सुखाचं आणि दुःखाचं मूळ कारण झोपच आहे याचा साक्षात्कार झाला!”, असेही तिने म्हटले.

दरम्यान हेमांगी कवीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्या या पोस्टवर अनेक लाईक्स आणि कमेंट पाहायला मिळत आहे. हेमांगी कवी ही सध्या ‘कलर्स मराठी’वरील ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेच्या मुख्य भूमिकेत झळकत आहे. तिच्यासोबत सुशील इनामदारही मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. ‘लेक माझी दुर्गा’ ही मालिका एका हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचे सांगितले जाते.