scorecardresearch

“माझे पहिले प्रेम…” हेमांगी कवीच्या ‘त्या’ पोस्टने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

या पोस्टवर एका युजर्सने तिला अभिनेत्री सई ताम्हणकरवरुन टोला लगावला आहे.

“माझे पहिले प्रेम…” हेमांगी कवीच्या ‘त्या’ पोस्टने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
हेमांगी कवी

मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी धुमाळ हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. ती नेहमी विविध विषयांवर सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. त्यासोबतच ती तिच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दलही नेहमी भाष्य करत असते. नुकतंच हेमांगी कवीने तिच्या आवडत्या रंगाबद्दल एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिला हा रंग का आवडतो याबद्दल भाष्य केले आहे.

हेमांगी कवी ही फेसबुकवर कायमच सक्रीय असते. नुकतंच हेमांगीने फेसबुकवर काही फोटो पोस्ट केले आहेत. यात तिने लाल रंगाचा एक ड्रेस परिधान केला आहे. याचे तिने चार वेगवेगळ्या पोझमधील फोटो शेअर केले आहेत. यासोबत तिने याला फार मोठे कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : “आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही”, अभिनेत्री हेमांगी कवीची पोस्ट व्हायरल

हेमांगी कवीची पोस्ट

“लहानपणी (अलीकडे या शब्दाचा वापर अधिक व्हायला लागलाय.. हे लक्षात आलंय माझ्या) तर माझ्या लहानपणी मला कुणी विचारलं की ” तुझा आवडता रंग कुठला?” तर मी म्हणायचे ‘लाल’. ठरलेलं उत्तर. या रंगाबद्दल कधी एवढं आकर्षण निर्माण झालं माहीत नाही पण solid आवडायचा हा रंग. तुम्हांला खोटं वाटेल पण माझ्याकडे 90 % गोष्टी लाल रंगाच्या असायच्या! कपडे, पेन, शाई, दप्तर, water bottle म्हणजे u name it आणि माझ्याकडे ते लाल रंगाचं असायचं!

अरे हो! रक्ताचा रंग लाल, हृदयाचं चित्र काढलं तर ते लाल, गुलाब लाल, जास्वंद लाल, प्रेमाचा रंग लाल, जगात सगळ्यात भारी रंग म्हणजे लाल असला बालिश युक्तिवाद मी मांडायचे! अजूनही shopping ला गेलं की माझा पहिला हात लाल रंगाच्या वस्तू, कपड्यांकडे जातो! College ला गेल्यावर तर काय रंगच रंग, अनेक छटा, पोत पण तरीही लाल रंगाची जागा ही वेगळीच होती.

काही वर्षांनी ती जागा काळ्या रंगाने घेतली. मला वाटलं चला लालचा सोस सुटला पण नाही!!! कितीही ठरवलं नाही घ्यायचा लाल रंग तरीही कुठल्या ना कुठल्या मार्गे हा लाल रंग शिरतोच माझ्या आयुष्यात! काय करणार… मेरा पेहला प्यार जो है!

मित्र परिवार गमतीत म्हणतात ‘म्हणूनच तू लाला नावाच्या माणसाशी लग्न केलंस!’ असं म्हणतात लाल रंग सावळ्या रंगाला शोभत नाही! मला हे कधीच पटलं नाही! मुळात कुठलाही रंग जर आपण नीट carry केला तर तो छानच दिसतो आणि त्यात जर आपला आवडता रंग असेल तर आपण ‘कमालच’ दिसतो! हो की नाही?

त.टी. : लाल रंग म्हणजे ‘Danger’ असं ही म्हणतात याची मंडळाने नोंद घ्यावी… तेव्हा comment करायच्या आधी सावधानी बाळगा! एक निर्धारीत सूचना!”, असे हेमांगी कवीने म्हटले आहे.

आणखी वाचा : “…अन् मी तब्बल १६ तास झोपले”, अभिनेत्री हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान हेमांगी कवीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्या या पोस्टवर अनेक लाईक्स आणि कमेंट पाहायला मिळत आहे. या पोस्टवर एका युजर्सने तिला अभिनेत्री सई ताम्हणकरवरुन टोला लगावला आहे. ही सई होऊ शकत नाही…..जास्त बोलणे अयोग्य, अशी कमेंट एका युजर्सने केली आहे. त्यावर उत्तर देताना मला व्हायचं ही नाही.., अशी कमेंट हेमांगीने केली आहे.

हेमांगी कवी ही सध्या ‘कलर्स मराठी’वरील ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेच्या मुख्य भूमिकेत झळकत आहे. तिच्यासोबत सुशील इनामदारही मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. ‘लेक माझी दुर्गा’ ही मालिका एका हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचे सांगितले जाते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या