मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून हेमांगी कवी धुमाळला ओळखले जाते. ती नेहमी तिच्या स्पष्ट मतासाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर तिचे मत स्पष्टपणे मांडताना दिसते. अनेकदा हेमांगी तिच्या खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींबद्दल भाष्य करत असते. नुकतंच हेमांगीने एखादी माहेरवाशीण कशी ओळखावी याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. यात तिने हळदी-कुंकूबद्दलही मत व्यक्त केले आहे.

हेमांगी कवी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच हेमांगीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिचे वेस्टर्न लूकमधील फोटोही शेअर केले आहेत. या फोटोत तिने जिन्स-टीशर्ट परिधान करत त्यावर हळदी-कुंकू लावलं आहे. यावरुन तिने तिच्या बालपणीची एक आठवण सांगितली आहे.
आणखी वाचा : “मी हा चित्रपट…” ‘महाभारता’त कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची ‘आदिपुरुष’च्या टीझरवर प्रतिक्रिया

Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात

हेमांगी कवीची पोस्ट

“Tell me you are माहेरवाशीण
Without telling me you are माहेरवाशीण!
Western कपड्यांवर ही जिच्या कपाळी हळद कुंकु दिसतं तिला माहेरवाशीण समजावं!
मुलगी,सुन ४ दिवस माहेरी/सासरी राहून आपल्या घरी निघाली की तिला हळद- कुंकू लावायचं! हे मी लहानपणापासून बघत आलेय.
लहानपणी आईने घरी आलेल्या पाहुण्यांना हळद- कुंकू लावलं की आम्हांला ही लावायचं हा नियमच होता! ते काय वय नव्हतं पण लहान मुलींच्या हट्टासमोर कुणाचं काय चालतंय? म्हणून माझी आई ही लावायची.
काय अप्रूप होतं काय माहीत पण मज्जा यायची. कदाचित आपण ही मोठे झालो आहोत हं, आता मला ही सगळं कळतं बरं का हे समजायची आणि दाखवण्याची हौस असावी. पण मुलींना एक खोड असतेच, त्यांना लवकर मोठ्ठं व्हायची घाई असते! मग कुठं आईच्या साड्या नेस, आईचं मंगळसुत्र घाल, चपला घाल, खेळात आईच हो!
तेव्हा वाटायचं कध्धी एकदाचे मोठे होतोय आणि आता वाटतंय…. Yes exactly हे वाचत असताना तुम्ही मनातल्या मनात जे म्हणालात ना तेच वाटतंय.
तर आता खरंच मोठं झाल्यावर त्या हळदी कुंकूचा हट्ट नाही राहीला पण तुम्ही त्याला परंपरा म्हणा, संस्कृती म्हणा किंवा अगदी लागलेली सवय म्हणा घरातून बाहेर पडताना कपाळावर लागलेले हे दोन रंग अजूनही मज्जाच आणतात”, असे हेमांगी कवीने म्हटले आहे.

आणखी वाचा : “माझ्या अत्यंत…” अमिताभ बच्चन यांना मराठी चित्रपटाची भूरळ

आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : ‘तू माझी आई आहेस का?’ अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादेमध्ये कडाक्याचे भांडण

दरम्यान हेमांगी कवीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटही दिल्या आहेत. तसेच हेमांगी कवी ही सध्या ‘कलर्स मराठी’वरील ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेच्या मुख्य भूमिकेत झळकत आहे. तिच्यासोबत सुशील इनामदारही मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. ‘लेक माझी दुर्गा’ ही मालिका एका हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचे सांगितले जाते.