scorecardresearch

“माझ्या प्रेमा” म्हणत पतीने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, ऋता दुर्गुळे कमेंट करत म्हणाली…

याला कॅप्शन देताना त्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“माझ्या प्रेमा” म्हणत पतीने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, ऋता दुर्गुळे कमेंट करत म्हणाली…

छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून ऋता दुर्गुळेला ओळखलं जाते. हृताने ‘फुलपाखरु’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. ती नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अशी तिची ओळख आहे. ऋता दुर्गुळे हिचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त सिनेसृष्टीतील अनेक कलाकर, चाहते तिला शुभेच्छा देताना दिसत आहे. नुकतंच ऋताचा पती प्रतीक शाह याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतीक शाह हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच प्रतीक शाहने इन्स्टाग्रामवर ऋतासोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे. यात ऋता ही त्याच्याकडे पाहताना दिसत आहे. याला कॅप्शन देताना त्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा : “निर्मात्यांशी माझे नेहमीच…”, ‘मन उडू उडू झालं’ मालिका सोडण्याच्या चर्चांवर हृता दुर्गुळेचे स्पष्टीकरण

यात प्रतीक म्हणाला, “माझ्या प्रेमा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. जसजसं तुम्ही एक वर्ष मोठे व्हाल, तसं तसे अधिक शहाणे, जागरुक आणि जबाबदार व्हाल. त्यासोबत आणखी एक वर्ष माझ्या जवळ याल. देव तुला तुझ्या जीवनातील सर्व सुख आणि यश देवो! ऋताला दिलेल्या आशीर्वादाबद्दल सर्वांचे आभार.” प्रतीकच्या या पोस्टवर ऋतानेही कमेंट केली आहे.

आणखी वाचा : “प्रतीक माझे निर्णय…”, नाटकासह छोट्या पडद्यावरील एक्झिटवर हृता दुर्गुळेचे स्पष्टीकरण

त्यावर ऋताने ‘धन्यवाद नवरोबा’ असे म्हटले आहे. प्रतीकची ही पोस्ट सध्या चांगली व्हायरल होत आहे. त्यासोबत त्यावर ऋताने दिलेली कमेंटही चर्चेत आहे.

दरम्यान ऋता दुर्गुळेचा‘अनन्या’, ‘टाईमपास ३’ हे दोन्हीही चित्रपट चर्चेत होते. या चित्रपटानिमित्ताने ती प्रसिद्धीझोतात आली. तसेच तिची मन उडू उडू ही मालिकाही चांगलीच गाजली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actress hruta durgule birthday wish from husband prateek shah actress special reply nrp