छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून ऋता दुर्गुळेला ओळखलं जाते. ऋताने ‘फुलपाखरु’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. ती नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अशी तिची ओळख आहे.‘अनन्या’, ‘टाईमपास ३’ या दोन्ही चित्रपटांमुळे ती अजूनही प्रसिद्धीझोतात आहे. काही दिवसांपूर्वी तिची प्रमुख भूमिका असलेली मन उडू उडू झालं या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर तिच्यावर अनेकदा टीका होताना पाहायला मिळते. मात्र नुकतंच तिने या सर्व टीकांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

ऋता दुर्गुळने नुकतंच एका प्रसिद्ध वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी तिने मालिका तसेच नाटकातून ब्रेक घेण्यामागचे कारण सांगितलं आहे. तसेच सलग दोन चित्रपट एकत्र प्रदर्शित होण्याबद्दलचा अनुभवही तिने सांगितला. यावेळी ती म्हणाली, “अनन्या या चित्रपटाचे शूटींग २०२० मध्ये मार्चपूर्वी आणि टाइमपास ३ या चित्रपटाचे शूट हे दुसऱ्या लॉकडाऊनपूर्वी झाले होते. मला या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल काहीही माहिती नव्हतो. ते कधी प्रदर्शित होणार आहे, याबद्दलही काही माहिती नव्हते. तर दुसरीकडे मी आठवड्याचे सहा दिवस सलग मालिकांमुळे घराघरात दिसायची. एकीकडे दिपू, अनन्या आणि पालवी या तिन्ही भूमिका साकारता आल्या यासाठी मी स्वतःला नशिबवान समजते.”
आणखी वाचा : “चित्रपटातील कलाकार मालिकेत काम करणाऱ्यांना कमी लेखतात” हृता दुर्गुळेने व्यक्त केली खंत

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!

“एखाद्या चित्रपटगृहात एकाच वेळी स्वत:च्या दोन चित्रपटांची पोस्टर पाहणे हे आनंददायी आणि समाधान देणारी गोष्ट असते. तुम्ही नवखे असताना दोन चित्रपट येणं, ही नक्कीच कलाकार म्हणून सुखावणारी गोष्ट आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या माझ्याकडून अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत याची मला जाणीव आहे”, असे ऋताने सांगितले.

“मी १० जुलैला दादा एक गुडन्यूज आहे या नाटकाचा शेवटचा प्रयोग केला. पण त्यानंतर मला सलग प्रयोग करणं शक्य नव्हतं. त्यात चित्रीकरणासाठी मला परदेशातही जावं लागणार होतं. यातच मालिकाही बंद झाली होती. मी स्वत: एखादी गोष्ट बंद झाल्यावरच दुसऱ्या गोष्टी सुरु करते. त्यामुळे मी ठरवून नाटकातून ब्रेक घेतला”, असे स्पष्टीकरण ऋताने दिले.

आणखी वाचा : “थोडंही वजन वाढलेल्या नायिकांना…” अखेर हृता दुर्गुळेने केलं ट्रोलिंगवर भाष्य

“मला मालिका किंवा छोट्या पडद्यामुळे आयुष्यात सर्व काही मिळालं आहे. त्याने मला आयुष्यात सगळं दिलं आहे. त्यामुळे तिथलं काम बंद करणार नाही. पण गेल्या दहा वर्षांपासून मी फार धावपळ करत आहे. यामुळेच आता स्वतःला वेळ द्यायची गरजही वाटते” असेही ऋता म्हणाली.