मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ‘पुढचं पाऊल’, ‘सरस्वती’, ‘बिग बॉस मराठी’ यांसारख्या मालिकांमधून जुई गडकरी ही घराघरांत पोहोचली. जुई गडकरी ही सध्या सिनेसृष्टीत सक्रीय नसली तरी सोशल मीडियावर ती कायमच सक्रीय असते. नुकंतच जुई गडकरीने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने कर्जतबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

जुई गडकरीने फेसबुकवर नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने कर्जतमधील वैद्यकीय सुविधा, सातत्याने विजेत होणारे बिघाड आणि त्यामुळे होणारे लोडशेडींग याबद्दल संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यात तिने अप्रत्यक्षपणे कर्जतकरांच्या व्यथा मांडल्या आहेत.

Indian Man who earns Rs 5 crore daily his parents wanted him to pursue PhD Google CEO Sundar Pichai Daily Salary Morning Habits
भारतीय तरुणाला दिवसाचा पगार ५ कोटी, नावाचा जगभर डंका; आई वडिलांची इच्छा होती PhD करावी पण त्यानं..
businessman was cheated
धक्कादायक! इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा व्हिडीओ वापरुन व्यावसायिकाची दहा लाखांची फसवणूक
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
loksatta kutuhal french computer scientist dr yann andre lecun deep learning and the future of ai zws 70
कुतूहल : यान आंद्रे लकून : डीप लर्निंगचे गॉडफादर

“…अन् उरलं सुरलं अवसान गळून गेलं”, गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या अभिनेत्री जुई गडकरीची पोस्ट चर्चेत

जुई गडकरीची फेसबुक पोस्ट

“तसा माझा त्याचा personally काहीच संबंध नव्हता.. त्याचे वडिल आमच्या कडे पुर्वी पंप ॲापरेटर म्हणुन काम करायचे.. आम्ही सगळे लहान होतो.. तो तोव्हा त्याच्या वडलांबरोबर आमच्याकडे यायचा.. आमच्यात खेळायचा.. आजीकडे एक- दोनदा जेवलाही होता आमच्याबरोबर.. आम्ही मोठे झालो.. कामं धंदे सुरु झाले.. तोही कामं करत होता.. मिळतिल ती.. कधी हॅाट्ल मध्ये शेफ, कधी कंत्राटी कामगार, प्लंबर, तर कधी गाण्याचे कार्यक्रम करायचा.. मी कर्जत ला आले की मला न चुकता “ज्युई कशी आहेस?” हे विचारायचा.. आमच्या शेजारच्या वाड्यात राहायचा त्यामुळे तशी नेहामीच भेट व्हायची..

काल अचानक त्याच्या जाण्याची बातमी आली आणि मनात खुप चलबिचल झाली… काय झालं असेल त्याला? अचानक असं कसं? खोटी तर नाही ना बातमी? परवाच तर भेटला होता… etc etc आज कारण कळलं.. ताप आला म्हणुन जिल्हा रुग्णालयात दाखल केलं त्याला.. सलाईन लावलं.. त्याच्या तोंडातुन फेस आला.. तब्येत खालावली.. म्हणुन पनवेल ला नेलं.. तिथल्या डॅाक्टरांनी त्याला मृत घोषित केलं… ????? नक्की काय झालं असेल?? काहीच कळत नाही…

पण मनात बऱ्याच वर्षांपासुन “कर्जत” च्या या गोष्टी बद्दल असलेली चीड ऊफाळुन आली… सगळ्यांचंच नशिब बलवत्तर नसतं.. काही वर्षांपुर्वी माझ्या वडलांना घरात लग्नं असताना severe heart attack आला आणि त्यांना पनवेल ला न्यावं लागलं.. तिथेही treatment मिळाली नाही म्हणुन मग नेरुळ ला त्यांची प्लास्टी केली..

मुद्दा असा की एवढ्या वर्षात कर्जत मध्ये एक “चांगलं” हॅास्पिटल असु नये??? प्रत्येक वेळी काही medical emergency आली की माणसांना लोदिवली किंवा पनवेल ला न्यायचं???? का??? माणसाचं आयुष्य ईतकं casually का घेतलं जातय ईथे??? बरं, हॅास्पिटल म्हंटलं कि किमान 24तास विजेची गरज.. तर त्या बद्दल तर न बोललेलच बरं…. मी कर्जतकर आहे आणि म्हणुन मला माझ्या गावात या किमान गरजा पुर्ण झालेल्या हव्यात… एक तास असा जात नाही ईथे जेव्हा लाईट जात नाही.. एरव्ही लोडशेडींग तर हक्काने असतच.. मग काय तर पावसाळा.. मग काय तर आज झाडं कापायची होती.. आज Transformer उडाला.. ई.ई… technical बाबी मान्यच आहेत कारण over heads आहेत..

पण या लाईट च्या सततच्या जाण्याने आपण किती वर्ष मागे मागे चाललोय हे का कळत नाहिये कोणालाच??? कधीही लाईट गेले आणि MSEB ला कॅाल केला कि उत्तर मिळतं खोपोलीवरुन गेलेत… गेली ३४ वर्ष मी आणि किमान ५०-६० वर्ष घरातले ईतर हिच उत्तरं ऐकताहेत!! पण यावर अजुनही solution निघालेलं नाहिये! सगळ्यांकडे Inverter आहेत ईथे… अन्नं वस्त्र निवारा आणि Inverter ह्या करजतकरांच्या किमान गरजा आहेत… पण Inverter charge होण्यापुरतं तरी लाईट असायला हवेत ना…

“मुंबई पासुन अवघ्या २ तासावर” अशी जाहिरात करणारे पण या बाबतित विचार करतच नाही की मुंबई पासुन एवढ्या जवळ असुन ही आमच्याकडे या किमान गरजा २०२२ मध्ये पण पुर्ण झालेल्या नाहियेत.. आणि या बाबतित सगळेच शांत… कितीही जीव का जाईनात… आम्हाला “सिंव्हगड बाय डेक्कन” एवढंच लाईफ आहे… वाईट वाटतंय आज हे share करताना कारण आज मी “माझ्या” अत्यंत लाडक्या कर्जत बद्दल अशा प्रकारे लिहीतेय… पण एक चांगलं हॅास्पिटल आणि २४तास लाईट हे “माझं” स्वप्नं कधी पुर्ण होईल माहित नाही…

पण आमच्या कर्जतला एकदातरी याच… खुप सुंदर आहे ते… एक कर्जतकर”, असे जुईने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान जुई गडकरीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्या या पोस्टला अनेकांनी लाईक्स केल्या आहेत. तसेच यावर अनेकांच्या कमेंटही पाहायला मिळत आहेत. यावर एका नेटकऱ्याने जे लिहीलय ते..वंडरफुल तरी कसं म्हणावं.. मनातली खंत अगदी पोटतिडकीने मांडलीय. खरंच अद्ययावत ईस्पितळ ही एकदम बेसिक गरज आहे शहराची, असे म्हटले आहे. तर एकाने जुईने मांडलेली व्यथा ही खरच कर्जतची शोकांतिका आहे, अशी कमेंट केली आहे.