scorecardresearch

“लॅम्बोर्गिनी आणि फेरारी म्हणजे प्रेम नव्हे तर…” क्रांती रेडकरने समीर वानखेडेंसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

क्रांती रेडकरचे पती समीर वानखेडे यांनी तिला एक सरप्राईज दिले आहे.

“लॅम्बोर्गिनी आणि फेरारी म्हणजे प्रेम नव्हे तर…” क्रांती रेडकरने समीर वानखेडेंसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
क्रांती रेडकर समीर वानखेडे

‘कोंबडी पळाली’ या गाण्याच्या तालावर सगळ्यांनाच थिरकायला लावणारी अभिनेत्री म्हणून क्रांती रेडकरला ओळखले जाते. ती कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच क्रांती रेडकरचे पती समीर वानखेडे यांनी तिला एक सरप्राईज दिले आहे. याबद्दल तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

क्रांती रेडकर ही सध्या एका शूटींगमध्ये व्यस्त आहे. याच निमित्ताने ती विविध पोस्ट करताना दिसते. नुकतंच क्रांतीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने समीर वानखेडेंचा फोटो पोस्ट केला आहे. याला तिने हटके कॅप्शन दिले आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे.
आणखी वाचा : “मी पत्र लिहिलंय, कारण मला फक्त…”; क्रांती रेडकरची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद

“जेव्हा तो तुमच्या सेटवर तुम्हाला भेटण्यासाठी येतो तेव्हा…धन्यवाद समीर वानखेडे माझ्यासाठी ही खास गोष्ट केल्याबद्दल… लॅम्बोर्गिनी आणि फेरारी असणं म्हणजे प्रेम नव्हे तर माझ्यासाठी हेच प्रेम आहे”, असे क्रांतीने त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “आज बाळासाहेब असते तर…,” क्रांती रेडकरचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

दरम्यान समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर त्यांच्यावर विविध आरोप प्रत्यारोप करण्यात आले. यानंतर लाचखोरीच्या आरोपांमुळे समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात अडकले. मात्र प्रत्येक प्रसंगांना ते हिंमतीने सामोरे गेले. क्रांती ही प्रत्येकवेळी त्यांच्या पाठिशी उभी राहिली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-12-2022 at 13:24 IST

संबंधित बातम्या