scorecardresearch

“भातुकलीच्या खेळामधली राजा-राणी…”, लग्नावरचा विश्वास उडालाय का? विचारणाऱ्याला मानसी नाईकचं स्पष्ट उत्तर

तुझा लग्नावरचा विश्वास उडालाय का? मानसी नाईक म्हणाली…

“भातुकलीच्या खेळामधली राजा-राणी…”, लग्नावरचा विश्वास उडालाय का? विचारणाऱ्याला मानसी नाईकचं स्पष्ट उत्तर
मानसी नाईक

मराठी अभिनेत्री मानसी नाईक सध्या सातत्याने चर्चेत आहे. तिच्या वैवाहिक जीवनात आलेल्या वादळामुळे या चर्चा सुरु झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच तिने पती प्रदीप खरेरापासून विभक्त होणार असल्याचं सांगितलं. या दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यातच आता मानसीने तिच्या लग्न आणि विवाहसंस्थेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. यात तिने प्रदीपवरही अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.

मानसी नाईक ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असते. अवघ्या महिनाभरापूर्वी मानसीने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत मानसी नाईकने घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडत भाष्य केले. “माझ्या घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दुःखी आहे.” असे तिने म्हटले होते. त्यानंतर आता नुकत्याच एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मानसीने तिला लग्नाबद्दल काय वाटते, यावर तिचे मत मांडले आहे.
आणखी वाचा : “एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण

यावेळी मानसीला तुझा लग्नावरचा विश्वास उडालाय का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, “माझा लग्नावरचा विश्वास अजिबात उडालेला नाही. कारण लग्न हे फारच खास असतं. होमहवन, हळद, मेहंदी, सप्तपदी याला काही तरी अर्थ आहे. जे लोक या अर्थाचा अनर्थ करतात, त्यांनी हा विचार करावा.”

“पण मानसी नाईक कधीही लग्न किंवा विवाहसंस्था या पद्धतीला विरोध करणार नाही. तशी वेळही आणून देणार नाही. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि एक राणी… हे असतं. त्यामुळे माझा लग्नावरचा विश्वास उडालेला नाही. तो उडू देखील नये. कारण आपण सर्व केलंय. मी समाजात अगदी नजरेत नजर घालून जगून शकतो. विचार त्यांनी करावा ज्यांनी खूप काही केलंय”, असा टोलाही मानसीने लगावला.

आणखी वाचा : “डोळ्यामध्ये पाणी होते…” मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदीप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. मात्र त्यानंतर तिने घटस्फोटाबद्दलचा निर्णय जाहीर केला. आता लवकरच ते दोघेही विभक्त होणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 14:44 IST

संबंधित बातम्या