अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. गेले २ दिवसही तिची चांगलीच चर्चा होताना आपण पाहिलं आहे. प्राजक्ता लंडनला कामानिमित्त गेली होती आणि तिथे तिने वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट दिली आणि तेव्हाचे फोटोजही तिने शेअर केले. यापैकीच तिची एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

प्राजक्ताने थेम्स नदीच्या ठिकाणचे फोटो शेअर करत भारताची खूप आठवण येत असल्याचं या पोस्टमध्ये म्हंटलं आहे. शिवाय तिने या पोस्टमधून लंडनच्या संस्कृतीवर आणि खाद्यसंस्कृतीवर टीका केली आहे. याबरोबरच तिच्या प्रत्येक मुद्द्यातून तिने भारत हाच कसा उत्तम देश आहे हे सांगितलं आहे. तिच्या या पोस्टवर बऱ्याच लोकांनी कॉमेंट करून तिला ट्रोल केलं आहे.

आणखी वाचा : लंडनबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळीला एवढा तिटकारा का?

आता पुन्हा प्राजक्ताने लंडनबद्दलच एक पोस्ट शेअर केली आहे. तिचं लंडनमधील काम पूर्ण झालं असून तीचा परतीचा प्रवास सुरू झाला असल्याचं तिने या पोस्टमध्ये सांगितलं आहे. या पोस्टमध्ये ती लिहिते, “वरवर कितीही रोष आहे असं वाटलं, लिहीलं नाही लिहीलं; तरी मुळाशी ‘कृतज्ञता’ आहेच…कारण भारतीय संस्कृतीनं शिकवलयं – “वसुधैव कुटूंबकम्” #हेविश्वचीमाझेघर” असं म्हणत तिने लंडन शहराचे आभार मानले आहेत.

प्राजक्ताच्या या पोस्टवरही नेटकरी कॉमेंट करून तिला ट्रोल करत आहेत. आता अचानक अशी पोस्ट का असा सवालही ते प्राजक्ताला विचारत आहे. प्राजक्ता ही अभिनेता आलोक राजवाडे याच्याबरोबर कामानिमित्त लंडनला गेली होती. तिचे लंडनचे बरेच फोटो व्हायरल झाले होते. अशा सोशल मीडिया पोस्टमुळे प्राजक्ता बऱ्याचदा चर्चेत असते.