scorecardresearch

“माझा पाठिंबा आहे…”, अभिनेत्री प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

नुकतंच प्राजक्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ती चर्चेत आहे.

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. प्राजक्ता ही ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचली. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. सध्या प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसते. नुकतंच प्राजक्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ती चर्चेत आहे.

प्राजक्ता ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने एका पेपरवर Y हे इंग्रजी अक्षर लिहिले आहे. त्याखाली तिने #24 जून असेही म्हटले आहे.

Dharmaveer Box Office Collection : ‘धर्मवीर’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

या पोस्टला कॅप्शन देताना तिने “माझा पाठिंबा आहे ! आपला…?” असा प्रश्न चाहत्यांना विचारला आहे. त्यावर अनेक चाहत्यांनी कमेंट करत उत्तर दिली आहेत. ‘माझा तुम्हाला पाठिंबा आहे’, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर एका नेटकऱ्याने ‘जिथे तुमचा पाठिंबा तिथे आमचा’ असे म्हटले आहे.

दरम्यान तिची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टद्वारे ती अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या वाय या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. सत्य घटनांवर आधारित असलेल्या ‘वाय’ या चित्रपटात मुक्ता ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, केंद्र सरकारची अप्रत्यक्षरित्या खिल्ली उडवल्याचा आरोप

येत्या २४ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘वाय’ या चित्रपटाची निर्मिती कन्ट्रोल-एन प्रॉडक्शनने केली आहे. अजित सूर्यकांत वाडीकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actress prajakta mali share one more instagram post for support mukta barve nrp

ताज्या बातम्या