बोल्ड कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना प्रिया बापटचं सडेतोड उत्तर

मराठी अभिनेत्री असून तुला असे कपडे परिधान करणं शोभतं का, असा शब्दांत नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली.

priya bapat and sai tamhankar
प्रिया बापट, सई ताम्हणकर

कपड्यांवरून, पोस्टवरून किंवा एखाद्या कमेंटवरून सोशल मीडियावर ट्रोल होण्याची वेळ बऱ्याचदा सेलिब्रिटींवर येते. मराठी अभिनेत्री प्रिया बापट इन्स्टाग्रामवर सक्रीय आहे. तिच्या फोटो आणि पोस्टवर चाहत्यांकडून भरभरून लाईक्स, कमेंट्ससुद्धा मिळतात. पण एका फोटोमुळे तिलाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे ट्रोलर्सना न जुमानता प्रियाने त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी प्रियाने सई ताम्हणकरसोबतचा एका कार्यक्रमातील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. या फोटोमधील प्रियाचा बोल्ड ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली. मराठी अभिनेत्रीने कोणते कपडे परिधान केले पाहिजेत याचं भान तू ठेवायला हवं अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिला सुनावलं. तर काहींनी तिच्या लूकची प्रशंसाही केली.

https://www.instagram.com/p/BpLafpIgml1/

#MeTooचा दणका; अजयने मेकअप आर्टिस्टची केली हकालपट्टी

प्रियाने त्याच पोस्टवर ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘प्रत्येकाला आपलं असं एक स्वतंत्र मत असतं हे मला माहित आहे. सोशल मीडियावर तुम्हाला तुमचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. पण कपड्यांवरून तुमचा स्वभाव कसा आहे हे कोणी कसं काय ठरवू शकतं. मला ज्यांनी पाठिंबा दिला त्यांची मी आभारी आहे. पण ज्यांना माझा पेहराव आवडला नाही त्यांच्या मताचा देखील मी आदर करते. माणसाची प्रवृत्ती ही त्याच्या कपड्यांवरून नाही तर वागणुकीतून दिसते. माझे कपडे ही माझी ओळख नाही. आपली प्रतिमा ही आपल्या वागणुकीने आणि कामाने तयार होते. आपण कोणते कपडे परिधान करतो यावरून नाही. तुम्हाला माझे कपडे आवडले नाही तरी हरकत नाही. पण त्यावरून माणसाची परीक्षा करणे मात्र चुकीचं आहे. या ट्रोलिंगमुळे मला वाईट वाटत नाही, उलट माझी सहनशक्ती वाढते,’ असं तिने लिहिलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi actress priya bapat gives an apt reply to trollers who trolled her for bold dress

ताज्या बातम्या