नेटफ्लिक्सवर नुकतीच ‘ट्रायल बाय फायर’ नावाची वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. १९९७ साली दक्षिण दिल्लीमधील ‘उपहार’ चित्रपटगृहाला लागलेल्या भीषण आगीवर ही वेबसीरिज बेतलेली आहे. यात अभय देओल आणि मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडे मुख्य भूमिकेत आहेत. राजश्रीने याआधीदेखील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिने शाहरुख खानबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
राजश्री सोशल मीडियावर सक्रीय असते तितकंच ती सामाजिक कार्यात सहभागी होत असते. तिने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने लिहले आहे, “करोना काळात शाहरुख खानने माझ्याबरोबर मराठवाडा, केरळ, छत्तीसगढ येथे मदत केली आहे. त्याच्या अतुलनीय अशा मीर फाउंडेशन अंतर्गत आम्ही या राज्यांना वैद्यकीय गरजा पुरवू शकलो. आणि आज फिल्म कम्पॅनियनने उत्तम परफॉर्मन्ससाठी आमची निवड केली आहे. करोना काळात आम्ही भेटू शकलो नाही. आणि मला माहिती नाही आमची भेट कधी होईल, पण माझे एक स्वप्न आहे की मला त्याच्याबरोबर काम करायचं आहे.”
“माझ्या मते उत्तम मिसळ…” अभिषेक बच्चनने ‘या’ ठिकाणाचा उल्लेख करत केला खुलासा
‘तलाश’, ‘सेक्सी दुर्गा’, ‘चोक्ड’, ‘अॅन्ग्री इंडियन गॉडेस’ अशा वेगळय़ा धाटणीच्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. नुकतीच तिने नवभारत टाइम्सला मुलाखत दिली. ज्यात तिने वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले तसेच सामाजिक कार्याबद्दलदेखील सांगितले आहे, महिलांच्या समस्यांसाठी तिने काम केले आहे.
राजश्री मूळची औरंगाबादची, तिचा लहानपणापासून रंगभूमीकडे ओढा होता. तिने पुण्यातुन आपले शिक्षण पूर्ण केले. आपल्या करियरची सुरवात तिने नाटकांपासून केली. नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घातलेल्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिज मध्ये तिने काम केले होते. तिने या वेबसीरिज मध्येखूप बोल्ड सीन्स दिले होते. तिच्या या बोल्ड सीन्सची चर्चा रंगली होती.