Video : लॉकडाउन काळात मन रमवण्यासाठी सईने शोधला उपाय

सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी सध्या देशभरात १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आलेलं आहे. या काळात नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आलेली आहे. कलाकारांपासून खेळाडूंपर्यंत सर्व सेलिब्रेटी या काळात आपल्या घरात राहून सोशल मीडियावर चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस फेस सई लोकूरनेही लॉकडाउन काळात आपलं मन रमवायला एक उत्तम पर्याय शोधला आहे. बेळगावमधील आपल्या घरात सईने क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

View this post on Instagram

Some quarantine cricket

A post shared by Sai Lokur (@sai.lokur) on

याआधीही सईने घरात पाककलेपासून, गाडी धुण्यापर्यंत सर्व काम केली आहे. प्रत्येक क्षणाचे फोटो आणि अपडेट सई सोशल मीडियावर चाहत्यांशी शेअर करत असते. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केलेल्या सई लोकूरला बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. अंतिम ३ पर्यंत पोहचलेली सई लोकूर ही विजेतेपदासाठीची दावेदार मानली जात होती. सई-पुष्कर आणि मेघा या त्रिकुटाने पहिल्या पर्वात आपली छाप पाडली होती. परंतु पहिल्या पर्वाच्या विजेतेपदाचा मान मेघा धाडेने पटकावला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi actress sai lokur shares her cricket playing video during lock down psd

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या