“बाबा जाऊ नको दूर…”, वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्री सायली संजीवची भावनिक पोस्ट

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव हिच्या वडिलांचे निधन झाले आहे.

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव हिच्या वडिलांचे निधन झाले आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सायलीचे वडील हे आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या ३० नोव्हेंबर २०२१ ला सायलीच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला.

नुकतंच सायली संजीव हिने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. याद्वारे तिने तिच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी दिली आहे. सायलीने तिच्या वडिलांसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. याला कॅप्शन देताना ती म्हणाली, “संजीव २६/०७/१९५८ – ३०/११/२०२१. तुला माहित आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल.. या जगात सगळ्यात जास्त.. तू आयुष्य आहेस माझं.”

“दैव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू.., शहाणी होते मी, वेडा होता तू, माझ्या साठी कारे सारा खर्च केला तू.., आज तू फेडुदे पांग हे मला, जगण्या रे मला अजूनही तूच हवा.. बाबा, थांब ना रे तू, बाबा जाऊ नको दूर….” अशी पोस्ट सायलीने लिहिली आहे. तिने शेअर केलेल्या या ओळी व्हेंटिलेटर चित्रपटातील एका गाण्यातील आहे.

सायलीच्या या पोस्टनंतर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट करत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. अभिषेक देशमुख, प्रार्थना बेहरे, सुयश टिळक, सुबोध भावे, मयुरी देशमुख यांनी या पोस्टवर कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच अनेक चाहत्यांनीही तिचे सांत्वन केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi actress sayali sanjeev father death actress instagram post viral nrp