अभिनेत्री स्नेहलता वसईकर ही मराठी मालिकांमुळे घराघरांत पोहचली. स्नेहलताचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेमध्ये तिने साकारलेली ‘सोयरा बाईसाहेब’ ही भूमिका तर प्रचंड गाजली. आजही तिला याच भूमिकेमुळे प्रेक्षक ओळखतात. ऐतिहासिक भूमिका साकारत असताना तिला पारंपरिक लूकमध्ये पाहणं प्रेक्षकांनी पसंत केलं होतं. पण आता ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

स्नेहलता सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले. पण तिच्या चाहत्यांना तिचा हा नवा लूक काही पसंतीस पडला नाही. पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये स्नेहलताने हे खास फोटोशूट केलं होतं. मात्र ट्रोलर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. आता तिने एक खास पोस्ट शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.

mugdha godbole shared angry post after kshitee jog receiving negative comments
“मंगळसूत्र घालावं की नाही?”, क्षिजी जोगच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या गलिच्छ कमेंट्स, प्रसिद्ध अभिनेत्री संतापून म्हणाली…
Saara Kahi Tichyasathi Fame Actor Abhishek Gaonkar engaged with social media sonalee patil
‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेत्याचा प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारशी मोठ्या थाटामाटात साखरपुडा, दोघांच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..

आणखी वाचा – VIDEO : ‘धर्मवीर’ पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये फक्त एकच माणूस, व्हिडीओ शेअर करत प्रसाद ओक म्हणाला…

तिने आणखी काही ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर करत म्हटलं आहे की, “नमस्कार मी स्नेहलता वसईकर, अर्थातच अभिनेत्री असल्यामुळे वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून मी आपल्या समोर येत असते. माझ्या प्रत्येक भूमिकेवर मायबाप रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. काही चुकलं तर समजूनही घेतलंत. ऐतिहासिक भूमिकांपासून मॉडर्न भूमिका असा प्रवास केला. प्रत्येक भूमिकेतून, अनुभवांमधून खूप गोष्टी शिकले. अजूनही वैविध्यपूर्ण भूमिका साकारायच्या आहेत, त्यातूनही अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. पण काय सांगू…? हे ट्रोलर्स….”

आणखी वाचा – “हा चित्रपटही पाहणार नाही कारण…”, Lal Singh Chaddhaचा ट्रेलर पाहून संतापले लोक

पुढे बोलताना स्नेहलता म्हणाली. “कधी-कधी असंच कमरेवर हात ठेऊन या ट्रोलर्सबरोबर भांडव असं वाटतं. त्यांना सांगावस वाटतं, तुमच्यावरील संस्कार तुमच्या कपड्यांवरून नाही तर तुमच्या विचारांमधून कळतात.” प्रत्येकाने एखाद्या कलाकाराला प्रत्येक लूकमध्ये स्वीकारलं पाहिजे असं स्नेहलताचं म्हणणं आहे. कौतुकास्पद गोष्ट म्हणजे स्नेहलताने ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत आपल्या नव्या लूकमधील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.