"माझ्या मते..." वेस्टर्न कपड्यांवर मंगळसूत्र न घालणाऱ्यांना सोनाली कुलकर्णीची सणसणीत चपराक | Marathi actress sonalee kulkarni talk about bikini and mangalsutra nrp 97 | Loksatta

“माझ्या मते…” वेस्टर्न कपड्यांवर मंगळसूत्र न घालणाऱ्यांना सोनाली कुलकर्णीची सणसणीत चपराक

तिच्या या उत्तराने वेस्टर्न कपड्यांवर मंगळसूत्र न घालणाऱ्यांना तिने सणसणीत चपराक लगावली आहे.

“माझ्या मते…” वेस्टर्न कपड्यांवर मंगळसूत्र न घालणाऱ्यांना सोनाली कुलकर्णीची सणसणीत चपराक
वेस्टर्न कपड्यांवर मंगळसूत्र न घालणाऱ्यांना सणसणीत चपराक

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणून सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला ओळखले जाते. तिने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. काही महिन्यांपूर्वी सोनाली कुलकर्णी ही नवरा कुणाल बेनोडेकरबरोबर मालदीवला गेली होती. त्यावेळी तिने बिकिनीबरोबर मंगळसूत्र परिधान केले होते. त्यामुळे ती चर्चेत आली होती. आता तिने यावर एका स्पष्टीकरण दिले आहे.

सोनाली कुलकर्णी ही गेल्यावर्षी कुणालबरोबर मालदीवला फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने बिकिनी, टू पीसमध्ये अनेक फोटो शेअर केले होते. त्यात ती फारच ग्लॅमरस दिसत होती. यावेळी तिच्या गळ्यातील मंगळसूत्राने सर्वांचेच लक्ष वेधून घेते होते. नुकतंच ‘लोकमत सखी’ला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दलचा खुलासा केला आहे.
आणखी वाचा : “आमच्यात वैर…” अमृता खानविलकरचा फोटो पाहताच सोनाली कुलकर्णी स्पष्टच बोलली

“सोनाली आणि तिचे स्टायलिश मंगळसूत्र याची कायमच चर्चा रंगते. यामागे नेमकी कल्पना कोणाची असते? तुला आम्ही बिकिनीवरही मंगळसूत्र परिधान करताना पाहिलं आहे, हे असं का?” असे प्रश्न सोनालीला या मुलाखतीत विचारण्यात आले होते. त्यावेळी तिने फार हटके स्टाईलने उत्तर दिले.

“मला मंगळसूत्र परिधान करायला आवडतं. मी बिकिनीवरही मंगळसूत्र घालून स्टाईल करु शकते. तसेच मला जर एखादं मंगळसूत्र आवडलं तर मी ते ऑर्डर करते. मी त्याबद्दल जास्त विचार करत नाही. एखादं मंगळसूत्र फार आवडलं तर मी ते लगेचच घेते”, असे सोनाली कुलकर्णीने म्हटले. तिच्या या उत्तराने वेस्टर्न कपड्यांवर मंगळसूत्र न घालणाऱ्यांना तिने सणसणीत चपराक लगावली आहे.

आणखी वाचा : सोनाली कुलकर्णी मालदिवमध्ये राहत असलेल्या रिसॉर्टचे एक दिवसाचे भाडे माहितेय का?

दरम्यान सोनाली कुलकर्णीने ही गेल्यावर्षी मालदीवमध्ये फिरण्यासाठी गेली होती. यावेळी तिने इन्स्टाग्रामवर मालदीव व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले होते. यात तिने लाल रंगाच्या एका टू पीस बिकीनीमध्ये छान स्टायलिश मंगळसूत्र परिधान केले होते. यात तिने सिल्व्हर चेन मंगळसूत्र परिधान केले होते. तर दुसऱ्या एका फोटो तिच्या गळ्यात एक मोती असलेले मंगळसूत्र पाहायला मिळाले. तिच्या या स्टायलिश मंगळसूत्र फार चर्चा रंगली होती. आता तिने यामागचे कारणही स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 10:27 IST
Next Story
‘बिग बॉस’शी बोलताना ढसाढसा रडला शिव ठाकरे; वीणाचं नाव घेत म्हणाला, “तिला…”