आज नवरात्रीचा सातवा दिवस. त्यामुळे सहाजिकच अभिनेत्री तेजस्विनी पंडितने पुन्हा एकदा देवीच्या रुपातला नवीन फोटो शेअर केला आहे. समाजातील प्रत्येक अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सलाम केल्यानंतर तेजस्विनीने आता जवानांचे आभार मानले आहेत. देशासाठी सिमेवर अहोरात्र लढणाऱ्या जवानांच्या कार्याला, त्यांच्या देशप्रेमाला तिने सलाम केला आहे. तेजस्विनीने शेअर केलेल्या फोटोमध्ये सीमेवर लढणारा जवान दाखविण्यात आला आहे. यात देशासाठी जीवाचे प्राणही अर्पण करेन, पण प्रथम समोरच्या शत्रूला संपवेन असा निश्चय या जवानाचा चेहऱ्यावर दिसत आहे. विशेष म्हणजे या जवानाच्या रुपात देवीच सीमेवर राहून देशवासीयांचं रक्षण करतेय असं दिसून येतंय.

View this post on Instagram

सप्तमी . . बळी पडली निष्पाप लेकरे , तुझ्या देशीच्या विषाणूने अन् आता गिळू पाहतो आहेस माझी मातृभूमी, तुझ्या राक्षसी महत्वकांक्षेने ? मोडू नकोस बांध आता माझ्या सहनशक्तीचा.. नाहीतर उडवीन तुझ्या चिंधड्या हजार गोठला जरी थेम्ब न थेम्ब रक्ताचा Design & Illustration : @indian_illustrator Photographer : @vivianpullan Writer : @rjadhishh_live Concept & Director : @dhairya_insta_ . . #navratri2020 #devi #देवमाणसं #दैवीकर्म #सैनिक #devbarekaro #coronawarriors #thankyou #warincovidtimes #indianarmy #armedforces #defenceforces #bsf #jaijawaan #navy #airforce #indianarmedforces #tejaswwini #gratitude #tribute

Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
heavy traffic jam for two hours in dombivli
डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit) on

“बळी पडली निष्पाप लेकरे , तुझ्या देशीच्या विषाणूने. अन् आता गिळू पाहतो आहेस माझी मातृभूमी, तुझ्या राक्षसी महत्वकांक्षेने ? मोडू नकोस बांध आता माझ्या सहनशक्तीचा.. नाहीतर उडवीन तुझ्या चिंधड्या हजार गोठला जरी थेम्ब न थेम्ब रक्ताचा”, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. दरम्यान, यापूर्वी तेजस्विनीने देवीच्या रुपातील सहा वेगवेगळे फोटो शेअर केल आहेत. या प्रत्येक फोटोमधून तिने मुंबई पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी मुक्या प्राण्यांसाठी झटणाऱ्या व्यक्ती आणि रुग्णवाहिका चालक यांचे आभार मानले आहेत.