गेल्या दोन महिन्यांत हिंदी चित्रपटांची तिकीटबारीवरची कमाई प्रचंड प्रमाणात गडबडली आहे. एरव्ही जून-जुलै महिन्यात फारसे चित्रपट प्रदर्शित केले जात नाहीत. पाऊस, नुकत्याच सुरू झालेल्या शाळा अशी अनेक कारणं यामागे असतात. तरीही यंदा जूनपासून हिंदीबरोबरच मराठी चित्रपटही सातत्याने प्रदर्शित होत आहेत. तिकीटबारीवरच्या कमाईची गणितं घडोत वा बिघडोत.. सध्या मोठय़ा प्रमाणावर चित्रपट प्रदर्शित करण्याचा सिलसिला सुरूच असून यात हिंदी चित्रपटांवरही मराठी चित्रपट भारी पडताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साधारणत: जून-जुलै या दोन महिन्यांत चित्रपट प्रदर्शनावर भर दिला जात नाही, मात्र त्यामुळेच ऑगस्ट महिन्यात चित्रपटांची प्रदर्शनासाठी एकच तारांबळ उडते. ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या सुट्टय़ा आणि दहीहंडी, गणेशोत्सवासारखे मोठे सण यामुळे चित्रपट प्रदर्शनासाठी एकूणच रस्सीखेच सुरू असते. हिंदीत ही स्पर्धा कायमच मोठी असते. त्याची चुणूक गेल्या आठवडय़ात रक्षाबंधनच्या निमित्ताने एकाचवेळी प्रदर्शित झालेल्या ‘लालसिंह चढ्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’ या दोन बिग बजेट हिंदी चित्रपटांवरून येते. मराठीतही ऑगस्टच्या पहिल्याच आठवडय़ात ‘एकदा काय झालं’ आणि  ‘दे धक्का २’ असे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मात्र यातली लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत प्रदर्शित होणाऱ्या हिंदी चित्रपटांपेक्षाही मराठी चित्रपटांची संख्या अधिक आहे. या दोन महिन्यात मिळून हिंदीत सात चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, तर मराठीत एकूण १४ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi awesome movies hindi huge film released ysh
First published on: 14-08-2022 at 00:02 IST