दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि त्यांचं भाषेवर असलेलं हे प्रेम तर सगळ्यांना माहित आहे. ते बऱ्याच वेळा मराठी भाषेविषयी आपण तिला किती कमी लेखतो यावर बोलताना दिसतात. आता मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं नागराज मुलाखतीत मराठी भाषेला किती दुय्यम स्थान दिलं जातं याविषयी बोलताना अनेक गोष्टी सांगिल्या. तर अजय-अतुल जोडीतील अतुलने मराठी कलाकार सुद्धा सेटवर मराठी नाही तर हिंदीत संवाद साधतात अशी तक्रार केली आहे.

“आपण शहरात गेल्यानंतर प्रमाण भाषा बोलायचा प्रयत्न करतो आणि घरी आल्यावर आपल्या बोलीभाषेत बोलतो. त्यावेळी आपल्या बोलीभाषेबद्दल आपल्याच मनात न्यूनगंड निर्माण होतो आणि मग आपण त्याचा वापर करणे थांबवतो. हे असं न करता प्रत्येकाने आपली बोलीभाषा जपली पाहिजे”, असे नागराज म्हणाले.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…

आणखी वाचा : एवढे पैसे कुठून आले? गाडी घेतल्यानंतर धमक्यांचे फोन; व्हिडीओ शेअर करत युट्यूबरने दिले स्पष्टीकरण

पुढे नागराज म्हणाले, “गावातले मुंबईत आले की त्यांना मराठी बोलायला लाज वाटते कारण त्यांना ती भाषा येत नाही. मी बऱ्याचवेळा प्रयत्न करतो की हॉटेलमध्ये ऑडर द्यायची तर मराठीत बोलतो. पण तिथून काही उत्तरच येत नाही. तर तिसऱ्यांदा बोलल्यानंतर कळतं की समोरची व्यक्ती ही मराठीच आहे.”

आणखी वाचा : युक्रेनच्या ‘या’ महिलेला घाबरत होते रशियाचे राष्ट्रपती पुतिन

यावर अतुल बोलतो “एवढचं काय आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये काही मराठी कलाकार आहेत, ते स्वत: सेटवर मराठीत नाही तर हिंदीत बोलतात. मी नाव घेतलं असतं पण नको. ते सरळ बोलतात ‘क्या चल रहा है? कैसा है आज कल?’ आमचं असं होतं तू काय हिंदीत बोलतोयस.” यावर नागराज बोलतात, “हिंदी कलाकार तसे बोलतात म्हणून ते ही तसेच बोलायला जातात.” तर अतुल बोलतो, “मी आणि अजय कुठेही गेलो. निर्माता हिंदी असला आणि त्याला मराठी भाषा कळत नसली तरी आम्ही मराठीत बोलतो. मराठी गायक जरी गात असेल तरी आम्ही चर्चा करताना मराठीतच करतो.”