62nd Maharashtra State Film Awards Full Winners List : मुंबईत नुकताच ६२ वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांच्या हस्ते मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकारांचा सन्मान करण्यात आला आहे. २०२५ चा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ गायक-संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना प्रदान करण्यात आला. याशिवाय प्रसाद ओक, राणी मुखर्जी यांचाही या पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात आला आहे.

या सोहळ्यात प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ सिनेमाला या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि उत्कृष्ट कोरिओग्राफी असे तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. याशिवाय सुनील बर्वे यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकल्यावर खास पोस्ट शेअर करत सर्वांचे मानले आहेत आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांना ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

६२ वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा – विजेत्यांची संपूर्ण यादी…

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता – सुनील बर्वे ( स्वरगंधर्व सुधीर फडके ) आणि गश्मीर महाजनी ( फुलवंती )
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – स्वाती गोतावळे ( छबिला )
  • सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण पुरस्कार अभिनेता – आदिश वैद्य ( स्वरगंधर्व सुधीर फडके )
  • सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण पुरस्कार अभिनेत्री – भक्ती घोगरे ( गिराण )
  • सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण पुरस्कार दिग्दर्शक – अनिल भालेराव ( छबिला )
  • उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री – रितिका श्रोत्री ( मुक्कामपोस्ट बोंबिलवाडी )
  • उत्कृष्ट विनोदी अभिनेता – अमेय परब ( कुर्ला टू वेंगुर्ला )
  • उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – तारानाथ खिरतकर ( स्थळ ) आणि जनार्दन कदम ( घात )
  • उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – नम्रता संभेराव
  • उत्कृष्ट पार्श्वगायक – आदर्श शिंदे ( लग्न कल्लोळ )
  • उत्कृष्ट पार्श्वगायिक – राजेश्वरी पवार ( सजना )
  • उत्कृष्ट पार्श्वसंगीत – संतोष मुळेकर ( संगीत मानापमान )
  • उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – महेश लिमये ( फुलवंती )
  • उत्कृष्ट कोरिओग्राफी – उमेश जाधव ( फुलवंती )

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
अनिल अमृत भालेराव – छबिला ( प्रथम )
नवज्योत बांदिवडेकर – घरत गणपती ( द्वितीय )
परेश मोकाशी – नाच गं घुमा ( तृतीय )

सर्वोत्कृष्ट चित्रपट
छबिला
घरत गणपती
नाच गं घुमा

कै. व्ही शांताराम सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट – स्थळ
कै. दत्ता धर्माधिकारी सामाजिक प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक – जयंत सोमलकर – स्थळ
कै. दादा कोंडके ग्रामिण प्रश्न हाताळणारा चित्रपट – नवरदेव BSC AGRI
कै. अनंत माने ग्रामिण प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक – रामचंद्र खाटमोडे ( नवरदेव BSC AGRI )

दरम्यान, सध्या संपूर्ण मनोरंजन विश्वातून या कलाकारांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.