scorecardresearch

“घर बंदूक बिर्याणीमध्ये आर्ची दिसली नाही?” चाहत्याच्या प्रश्नावर नागराज मंजुळे म्हणाले…

नागराज मंजुळे यांच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत जंगल अवताडे यांनी केलं आहे

“घर बंदूक बिर्याणीमध्ये आर्ची दिसली नाही?” चाहत्याच्या प्रश्नावर नागराज मंजुळे म्हणाले…
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन ६ वर्षे उलटली आहेत. तरीही आजही या चित्रपटाची चर्चा होत असते. या चित्रपटातील ‘आर्ची’ आणि ‘परश्या’ ही दोन मुख्य पात्र चांगलीच गाजली. प्रेक्षक आजही या पात्रांना विसरलेले नाहीत. अशाच एका प्रेक्षकाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना आर्चीबाबत प्रश्न विचारला ज्यावरून प्रेक्षकांमध्ये हशा पिकला.

‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’, ‘झुंड’ यांसारखे सुपरहिट चित्रपट देणारे नागराज मंजुळे सध्या चर्चेत आहेत. त्यांचा ‘घर बंदूक बिर्याणी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमिताने शोध मराठी मनाचा २०२३ या कार्यक्रमात नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर सहभागी झाले होते. तेव्हा एका प्रेक्षकाने नागराज यांना विचारले की या चित्रपटात आर्ची दिसली नाही, त्यावर नागराज यांनी उत्तर दिले, “आर्ची हा काही रोल नाही, हा आमच्या तिघांचा चित्रपट आहे. आम्ही तिघे तुला दिसलो नाही का? जे दिसले नाही ते विचारतो, हा चित्रपट एक वेगळा चित्रपट आहे फक्त टीझरवरून तुम्ही अंदाज बंधू शकत नाही. त्यामुळे यात आर्ची वगरे तुम्ही शोधू नका.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

“अक्षय कुमार माझ्यासाठी देवदूतच, कारण…” ‘सेल्फी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान इम्रान हाश्मीचा मोठा खुलासा

‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर पोलिस व गुन्हेगार यांच्याभोवती फिरणारी ही चित्रपटाची कथा आहे असं दिसून येत आहे. येत्या मार्च महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोललं जात आहे.

नागराज मंजुळे यांच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत जंगल अवताडे यांनी केलं आहे. चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षक नागराज यांच्या नव्या लूकचं कौतुक करत आहेत. तसेच नागराज मंजुळे यांचा स्वॅग कमालीचा आहे, आम्ही चित्रपटाची वाट पाहत आहोत असं प्रेक्षकांनी कमेंटच्या माध्यमातून म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 15:27 IST

संबंधित बातम्या