scorecardresearch

‘तू मावा खातोस का?’ विचारणाऱ्याला अभिनय बेर्डेचे सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाला “मी…”

त्यावर अभिनय बेर्डेच्या टीमने ‘तोंड सांभाळून बोला’ असा रिप्लाय दिला आहे.

abhinay berde
अभिनय बेर्डे

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याचा ती सध्या काय करते हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाद्वारे तो प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. यानंतर आता लवकरच तो एका नवीन चित्रपटात झळकणार आहे. मन कस्तुरी रे असे त्याच्या नव्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात अभिनय बेर्डे आणि तेजस्विनी प्रकाश ही नवी जोडी मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

नुकतंच या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा पिल्लई एज्युकेशन कॅम्पस येथे पार पडला. या लाँच सोहळ्यादरम्यान अभिनय बेर्डे आणि तेजस्विनी प्रकाश यांनी ढोल ताशावर ठेका धरला. याचे अनेक व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचा एक व्हिडीओ अभिनयनेही स्वत:च्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत तो नाचत असल्याचे दिसत आहे. यावेळी नाचत असताना तो काहीतरी चघळत असल्याचे दिसत आहे. यावरुन एका नेटकऱ्याने त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
आणखी वाचा : “मी तुमच्या गटाचा…” एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यानंतर अवधूत गुप्तेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

अभियनचा हा व्हिडीओ पाहून एका नेटकऱ्याने त्याखाली कमेंट केली आहे. ‘तू मावा खातोस का?’ असा सवाल नेटकऱ्याने अभिनयला केला आहे. त्यावर अभिनय बेर्डेच्या टीमने ‘तोंड सांभाळून बोला’ असा रिप्लाय दिला आहे. त्यावर अभिनयनेही खोचक शब्दात त्यावर कमेंट केली. ‘मी मावा खात नाही पण मवाली आहे मी’, अशा शब्दात अभिनयने त्या नेटकऱ्याला प्रत्युत्तर दिले. यामुळे तो नेटकरी शांतच बसला.

abhinay berde 1

आणखी वाचा : “हा चित्रपट…” ‘शिवप्रताप गरुडझेप’ पाहिल्यानंतर प्रिया मराठेची प्रतिक्रिया चर्चेत

दरम्यान अभिनय बेर्डे लवकरच मन कस्तुरी रे या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तेजस्विनी एका बिनधास्त तरुणीची म्हणजेच श्रुतीची भूमिका साकारत आहे. यात ती एक गायिकेची भूमिका करणार आहे. या प्रवासात तिच्यावर नकळतपणे प्रेम करणारा सिद्धांत हा चित्रपटाचा नायक तिला कसा भेटतो आणि त्यांची प्रेमकहाणी कशी खुलत जाणार याची ही कहाणी मन कस्तुरी रे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-10-2022 at 13:56 IST