सध्या गणपतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचं वातावरण आहे. अनेक कलाकारांच्या घरीही बाप्पा विराजमान झाला आहे. त्याचे फोटो आत्तापर्यंत अनेक सेलिब्रेटींनी पोस्ट केले आहेत. अनेक कलाकारांच्या हटके डेकोरेशनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तर आता सर्वत्र अमेय वाघ याच्या घरी बाप्पासाठी केलेली सजावट चर्चेत आली आहे.

अभिनेता अमेय वाघ याने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमधून काम केलं. मराठीबरोबरच हिंदी मनोरंजन सृष्टीत देखील त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून तो त्याच्या चाहत्यांना त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींबद्दल अपडेट्स देत असतो. नुकतेच त्याने त्याच्या घरच्या गणपतीचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. आई-वडिलांना केदारनाथला जाता आलं नाही म्हणून त्याने चक्क गणपतीसाठी केदारनाथचा देखावा तयार केला आहे.

आणखी वाचा : “आजही नकारांचा सामना करावा लागतो कारण… ” रेणुका शहाणेंनी समोर आणली बॉलिवूडची दुसरी बाजू

अमेयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत त्याने त्याच्या घरी गणपती बाप्पासाठी बनवलेल्या या केदारनाथच्या देखाव्याची झलक चाहत्यांना दाखवली. हा खास व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं, “माझ्या आई बाबांना काही कारणामुळे ‘केदारनाथ’ ला जाता आलं नाही म्हणून आमच्या महेश काकांनी तोच देखावा घरी तयार केला! आता गणपती थाटामाटात बसले आहेत! गणपती बाप्पा मोरया.”

हेही वाचा : “जंगलात राघू खूप असतात पण…” अमेय वाघने सुमित राघवनवर साधला निशाणा

तर आता त्याच्या हा देखावा खूप चर्चेत आला आहे. त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओवर कमेंट करत त्याचे चाहते त्याचं कौतुक करत आहेत. याचबरोबर हा देखावा खूप आवडल्याचंही सांगत आहेत.

Story img Loader