गश्मीर महाजनी हा मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. गश्मीर हा ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मुलगा आहे. त्याने ‘देऊळबंद’, ‘सरसेनापती हंबीरराव’ यांसारख्या दमदार मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अलीकडेच त्याने सोशल मीडियावर ‘आस्क गॅश’ हे प्रश्नोत्तरांचं सेशन घेऊन चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
हेही वाचा : पंजाबी विकी कौशलची लाडक्या आईसाठी मराठीतून पोस्ट, नेटकरी म्हणाले, “मन जिंकलस आमचं…”
गश्मीर महाजनीला त्याच्या एका चाहत्याने “तुमचा आवडता मराठी दिग्दर्शक कोण आहे?” असा प्रश्न विचारला. यावर “प्रवीण तरडे…बाकी कुणीच नाही. आपल्याला चांगल्या दिग्दर्शकांची गरज आहे.” असं उत्तर अभिनेत्याने दिलं.
हेही वाचा : “…वाईट मनस्थिती झाली होती”, किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले “फक्त दोन सीन…”
पुण्यात असताना गश्मीर आणि प्रवीण तरडेंची पहिल्यांदा भेट झाली होती. पुढे हळुहळू दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. त्यानंतर अभिनेत्याने ‘देऊळबंद’, ‘धर्मवीर’ आणि ‘सरसेनापती हंबीरराव’ अशा अनेक चित्रपटांमध्ये प्रवीण तरडेंसह काम केलं. त्यामुळे आवडता दिग्दर्शक म्हणून गश्मीरने प्रवीण तरडे यांचं नाव घेतलं.
हेही वाचा : प्रिया बापट : चाळीत वाढलेली बबली गर्ल ते बहुपेडी अभिनेत्री
दरम्यान, गश्मीर महाजनी आता लवकरच एका नव्या ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी अभिनेत्याने ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यामुळे आता गश्मीर कोणती ऐतिहासिक भूमिका साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.