scorecardresearch

“…ते माझ्यासाठी अनपेक्षित होतं,” ‘सरला एक कोटी’ चित्रपटाबद्दल ओंकार भोजनेची प्रतिक्रिया

या चित्रपटात ओंकार भोजने, इशा केसरकर मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे

“…ते माझ्यासाठी अनपेक्षित होतं,” ‘सरला एक कोटी’ चित्रपटाबद्दल ओंकार भोजनेची प्रतिक्रिया
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. काही दिवसांपूर्वीच ओंकारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेला रामराम केला. त्यानंतर तो ‘फू बाई फू’ या कार्यक्रमात दिसला. आता लवकरच तो मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ‘सरला एक कोटी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील भूमिकेविषयी त्याने आपले मत मांडले आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसत आहे, माध्यमांशी बोलताना तो असं म्हणाला, “सुरवातीला नर्व्हस होतो कारण लोकांनी मला हिरो म्हणून स्वीकारायच्या आधीच चित्रपटातल्या हिरॉइनने मला स्वीकारायला हवं, आम्ही चित्रपटाच्या वर्कशॉप दरम्यान भेटलो सुदैवाने त्यांनीदेखील एकांकिका नाटक यातून सुरवात केली असल्याने समजून घेणं सोपं गेलं. मला कधीच वाटलं नव्हतं माझ्या नशिबात रोमँटिक गाणे येईल कारण ते मला अजिबात जमत नव्हते, पण थोडंफार मी डान्स केला आहे. लहानपणी मी पत्ते खेळायचो तोच खेळ माझ्या चित्रपटात येईल असं वाटत नाही, आपलं काम इतरांच्या बरोबरीने चर्चेचा विषय होईल असं वाटलं नव्हतं.” अशा शब्दात त्याने प्रतिक्रिया दिली.

या चित्रपटात ओंकार भोजने, इशा केसरकर मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. तसेच या चित्रपटाची कथा ग्रामीण भागावर आधारित असल्याचं टीझर पाहिल्यानंतर लक्षात येतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन सिंधु विजय सुपेकर यांनी केलं आहे. तर ओंकार व ईशासह छाया कदम चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये काम करताना दिसतील. २० जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-01-2023 at 17:56 IST

संबंधित बातम्या