scorecardresearch

Premium

Video बायकोच्या गैरहजरीत मुलांना सांभाळताना होतेय रितेश देशमुखची कसरत; अभिनेत्याने थेट दिवसभराच टाईमटेबलच केलं तयार

रितेशने मुलांच्या सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंतचे संपूर्ण टाईमटेबल तयार केलं आहे.

riteish-deshmukh-planning-while-taking-care-of-the-children
रितेश देशमुखने मुलांचे दिवसभराचे टाईमटेबल केलं तयार

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल आहेत. सोशल मीडियावर दोघे नेहमी सक्रिय असतात. निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. सोशल मीडियावर शेअऱ केलेल्या व्हिडीओमधून रितेश आणि जिनिलीयामधील केमिस्ट्री दिसून येते. दरम्यान जिनिलियाने रितेश देशमुखचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

हेही वाचा- “तुझं स्थान…”, प्रथमेश परबच्या खऱ्या आयुष्यातील प्राजूला पाहिलंत का? वाढदिवशी शेअर केली रोमँटिक पोस्ट

fraud with youth pune
पुणे : ऑनलाइन टास्कमध्ये १५० रुपये कमावले; अन् गमावले साडेसतरा लाख
Student organizations protest against Governor Arif Mohammad Khan in Kerala
केरळच्या राज्यपालांचे रस्त्यावरच दोन तास ठाण; ‘एसएफआय’च्या निदर्शनांनंतर केंद्राकडून झेड सुरक्षा
salman khan met fan who recovered from cancer
९ वर्षांच्या चाहत्याने कॅन्सरवर मात केल्यानंतर सलमान खानने दिलेलं वचन केलं पूर्ण; मुलाची आई म्हणाली, “त्याच्या मेंदूमध्ये गाठ…”
mumbai municipal corporation marathi news, mumbai concretization work marathi news
पाच टक्के रस्त्यांचेच काँक्रीटीकरण, मुंबईतील उर्वरित ९५ टक्के काम कधीपर्यंत पूर्ण करणार? उच्च न्यायालयाची महापालिकेला विचारणा

रितेश देशमुख तीन दिवसाचं वेळापत्रक लिहिताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत तिने “आई तीन दिवसांसाठी बाहेर जाणार आहे, आणि बाबांनी घर सांभाळायचं ठरवलं आहे, रितेश आय लव्ह यु” असं कॅप्शनही दिलं आहे. जेनेलिया तीन दिवसांसाठी बाहेर जाणार असून मुलांना सांभाळण्याची जबाबदारी रितेशने घेतली असल्याचे दिसून येत आहे. जिनिलियाच्या गैरहजरीत मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून रितेशनेच चक्क त्यांचं तीन दिवसांच वेळापत्रक बनवलं आहे.

रितेश आणि जिनिलिया दोघे मिळून मुलांच संगोपन करतात. दोघेही अनेकदा त्यांच्या मुलांबरोबर वेळ घालवताना दिसतात. सोशल मीडियावरही अनेकदा रितेश आणि जिनिलिया आपल्या मुलांबरोबरचा व्हिडीओ शेअऱ करत असतात. जिनिलियाच्या गैरहजरीत रितेश मुलांकडे विशेष लक्ष देताना दिसतो.

हेही वाचा-

रितेश जिनिलीयाप्रमाणे त्यांची मुलंही नेहमीच चर्चेत असतात. रितेश जिनिलीयाच्या दोन्ही मुलांच्या संस्काराचे कायमच कौतुक होतं. पालक म्हणून रितेश आणि जिनिलियाने आपल्या मुलांचा चांगले संस्कार दिले आहेत हे वेळोवेळी समोर आलं आहे. रितेश आणि जिनिलिया अनेकदा त्यांच्या मुलांबरोबर विविध ठिकाणी एकत्र हजेरी लावताना दिसतात. दरवेळी त्यांची दोन्ही मुलं फोटोग्राफर्सना बघून हात जोडताना दिसतात. त्यांच्या या कृतीबद्दल त्यांचं सगळेजण नेहमीच कौतुकही करतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor riteish deshmukh planning while taking care of the children absent his wife genelia deshmukh dpj

First published on: 29-11-2023 at 17:43 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×