अभिनेता शरद केळकरने हिंदीसह मराठीमध्येही उल्लेखनीय काम केलं आहे. अलिकडेच त्याचा ऐतिहासिक ‘हर हर महादेव’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये त्याने बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली होती. मराठीसह हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शरदने याबाबतच आता भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – “कधी बायको म्हणून…” विक्रम गोखले यांच्या निधनानंतर नीना कुळकर्णी भावूक, एकत्र केलेला ‘तो’ चित्रपट ठरला शेवटचा

शरदने एका मुलाखतीदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. यामध्ये त्याने मराठी माणसंच मराठी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये येत नसल्याची खंत बोलून दाखवली. तसेच चित्रपटाला शो मिळाले नसल्याचं दुःख व्यक्त केलं.

शरद म्हणाला, “आपला इतिहास फक्त महाराष्ट्रा पुरताच मर्यादित राहिला आहे हिच आपली मोठी अडचण आहे. आपला इतिहास बाहेरच्या लोकापर्यंत पोहोचत नाही. म्हणूनच पॅन इंडिया चित्रपट बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला. हा चित्रपट तमिळ, तेलुगू अशा विविध भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराज पोहोचले तिथे आम्ही हा चित्रपट प्रदर्शित केला. पण दुर्देवाने या चित्रपटाला शो मिळाले नाहीत. कोण शो देत नाहीत हे मला माहित नाही.”

आणखी वाचा – “न्यूटन मोठाच पण ज्ञानेश्वर माऊली त्यापेक्षा…” शरद पोंक्षेंनी ‘तो’ व्हिडीओ शेअर करताच नेटकरीही करताहेत कौतुक

“संपूर्ण मुंबईमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी हिंदीमध्ये फक्त चार शो मिळाले. या गोष्टीचं मला दुःख वाटतं. याचा दोष मी स्वतःलाच देईन. कारण आपली मराठी माणसं मराठी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये जात नाहीत. नाहीतर आपले चित्रपटही तमिळ, तेलुगूसारखे ३००, ४०० कोटी रुपये बजेट असलेले चित्रपट बनवू शकतात. चांगले चित्रपट बनवण्याची हिंमत मराठीमध्येही आहे. पण त्याबाबत विचार केला पाहिजे. आता पुन्हा पुढील वर्षी मी काहीतरी नवीन घेऊन येईन.” आता शरद आणखी कोणता नवा चित्रपट घेऊन येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor sharad kelkar talk about marathi cinema and less response for movie from audience see details kmd
First published on: 27-11-2022 at 21:12 IST