मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांचा आज ५६वा वाढदिवस. शरद पोंक्षे हे त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. कर्करोगावर यशस्वीरित्या मात करत त्यांनी पुन्हा एकदा कलाक्षेत्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये बरेच चढ-उतार आले. पण ते डगमगले नाहीत. त्यांनी प्रत्येक प्रसंगाशी हिंमतीने सामना केला. आज वाढदिवसानिमित्त शरद पोंक्षे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शरद पोंक्षे यांच्या लेकानेही वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

शरद यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा स्नेह वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत आहे. स्नेह कलासृष्टीमध्ये कार्यरत आहे. हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर’ चित्रपटासाठी स्नेहने काम केलं आहे. ‘धर्मवीर’च्या दिग्दर्शकांच्या टीममध्ये स्नेहचा सहभाग होता. आता त्याने वडिलांसाठी शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

Manoj Bajpayee father auditioned at FTII
NSD मध्ये रिजेक्ट झालेल्या अभिनेत्याच्या वडिलांनी FTII मध्ये दिली होती ऑडिशन, धर्मेंद्र अन् मनोज कुमार होते उपस्थित, वाचा किस्सा
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
34 Year Old Marries 80 Year Old Reel Star
८० वर्षांच्या रीलस्टारच्या प्रेमात महाराष्ट्रातील ३४ वर्षीय शीला झाली ‘दिवानी’; लग्नासाठी पार केले ६०० किमी अन् आता..
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे वडील शरद पोंक्षे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत त्याने म्हटलं की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.” त्याचबरोबरीने त्याने वडिलांबरोबरचा दुसरा फोटोही शेअर केला. पण हा फोटो स्नेहच्या अगदी बालपणीचा आहे. तसेच यामध्ये शरद पोंक्षेही अगदी तरुण दिसत आहेत. शिवाय त्यांचं घरही अगदी साध दिसत आहे.

आणखी वाचा – Photos : शरद पोंक्षे यांचा मुलगा कोण आहे माहितेय का? ‘धर्मवीर’ चित्रपटासाठीही केलंय काम

स्नेह हातात ट्रॉफी घेऊन उभा आहे आणि शरद पोंक्षे यांच्या चेहऱ्यावर हास्य खुललेलं या फोटोमध्ये दिसत आहे. “माझी पहिली ट्रॉफी. माझं घर. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.” असं म्हणत पुन्हा एकदा वडिलांना त्याने भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.