अभिनेते शरद पोंक्षे त्यांच्या रोखठोक वक्तव्यमुळे कायमच चर्चेत असतात. सोशल मीडियावरही ते फार सक्रिय असतात. नेहमी त्यांच्या व्याख्याना दरम्यानचे व्हिडीओ शरद पोंक्षे इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करतात. या माध्यमातून माहितीपूर्ण व्हिडीओ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आता त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
आणखी वाचा – वनिता खरातने ‘या’ रिसॉर्टमध्ये केलं लग्न, खर्च केले हजारो रुपये, जेवणाचीच किंमत आहे तब्बल…
शरद पोंक्षे यांनी फेसबुक अकाऊंटद्वारे त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांबाबत भाष्य केलं आहे. शरद पोंक्षे म्हणाले, “मी रस्त्याने जात होतो. एक कुत्रं खूप भूंकत होतं. त्याला वाटलं मी त्याला हाड करेन, दगड मारेन. पण मी न बघताच निघून गेलो, ते मागे भूंकत राहीलं. मग गल्लीत शांत झालं. काहींना एवढीच किंमत द्यावी. ते भूंकतात व स्वतःच शांत होतात.”
शरद पोंक्षे यांच्या या पोस्टवरून टीका करणाऱ्यांसाठी ही पोस्ट लिहिली आहे असं दिसतं. मात्र एका चाहत्याने शरद पोंक्षे यांच्या या पोस्टवरुन कमेंट केली. या चाहत्याला रिप्लाय करत त्यांनी सुनावलं आहे. “तुम्ही असं नेहमी लिहता याचा अर्थ कुठे तरी तुम्ही विचलित होता. खुप मोठं काम तुम्ही करत आहात, भाग्यवान आहात. अनाहूत सल्ल्यासाठी क्षमस्व. परंतू अगदीच राहवले नाही.” असं त्या चाहत्याने शरद पोंक्षे यांच्या पोस्टवर कमेंट केली.
यावर शरद पोंक्षे म्हणाले, “मीही माणूसच आहे संत नाही.” बहुदा चाहत्याचं म्हणणं शरद पोंक्षे यांना पटलं नाही. तर काहींनी त्यांच्या या पोस्टचं कौतुक केलं. तुम्ही बोलणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका असे चाहते शरद पोंक्षे यांना सांगताना दिसत आहेत.