मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्हीही माध्यमांवर ठसा उमटवणारे शरद पोंक्षे गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहेत. विद्यार्थीदशेमध्ये असताना त्यांनी नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. मराठी रंगभूमीवर नाव कमावल्यानंतर त्यांनी मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. ‘अग्निहोत्र’, ‘वादळवाट’ अशा काही अजरामर मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. मराठीसह हिंदी माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रामध्येही काम केले आहे.

काही वर्षांपूर्वी ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक मराठी रंगभूमीवर आले होते. वादग्रस्त विषयामुळे आजही या नाटकाबद्दल बोलले जाते. शरद पोंक्षे यांनी या नाटकामध्ये नथुरामची भूमिका साकारली होती. त्यांच्या कामाचे कौतुक झाले होते, तर काहींनी त्यांना विरोधही दर्शवला होता. या नाटकामध्ये काम करताना त्यांनी ऐतिहासिक मुद्द्यावर भाष्य करायला सुरु केली. हळूहळू त्यांची राजकीय भूमिका लोकांसमोर यायला लागली. भाषण, लेख यांमधून ते व्यक्त होऊ लागले.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
arvind kjriwal jail tihar
अरविंद केजरीवाल करणार वर्क फ्रॉम जेल? काय आहेत कायदेशीर तरतुदी?
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी

आणखी वाचा – समीर चौगुलेंनी शेअर केला तरुणपणीचा फोटो, प्राजक्ता माळीचा डायलॉग कमेंट करत चाहते म्हणाले…

शरद पोंक्षे सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांपैकी एक आहेत. त्यांच्या पोस्ट तुफान व्हायरल होत असतात. या माध्यमांमार्फत ते हिंदुत्त्ववादी विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतात. महात्मा गांधी यांची हत्या केल्यामुळे नथुराम गोडसेला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. आज त्याचा स्मृतीदिन आहे. या निमित्ताने नथुरामचा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या फोटोवर त्यांनी “हुतात्मा पंडित नथुराम गोडसे आत्मार्पण दिन, १५ नोव्हेंबर १९४५ बलिदान दिवस”, असे लिहिले आहे.

आणखी वाचा – “तुमने पुकारा और…” ‘बिग बॉस’च्या घरात जाण्याबद्दल अभिजीत बिचुकलेचे संकेत

शरद पोंक्षे सध्या अंदमान दोऱ्यावर आहेत. सहा दिवसांनंतर ते घरी परतणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काळ्या पाण्याच्या शिक्षेदरम्यान ज्या कारागृहामध्ये ठेवण्यात आले होते, त्या जागेला भेट देणार आहेत.