मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून श्रेयस तळपदे ओळखला जातो. आपल्या अभिनयाच्या जोरावर श्रेयसने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या श्रेयस त्याचा आगामी चित्रपट ‘ही अनोखी गाठ’मुळे चर्चेत आहे. मराठी बरोबरच हिंदी चित्रपटांमध्ये श्रेयसने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. श्रेयसने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमवर भाष्य केले आहे.

श्रेयस म्हणाला, “ज्यांना आपण स्टार किड्स म्हणतो, त्यांच्यासाठी काही गोष्टी नक्कीच सोप्या असतात. आपल्यासमोर याची काही जिवंत उदाहरणे आहेत. मराठीमध्ये नेपोटिझमचे प्रमाण कमी आहे, पण स्टार किड्ससाठी चित्रपटात येण्याचा मार्ग सोप्पा असतो. स्टार किड्स असो अथवा नसो, त्याला केवढा मोठा करायचा हे प्रेक्षकच ठरवत असतात. त्यामुळे मला या गोष्टीचा कधीच राग नाही आला किंवा मी त्याचा एवढा विचारही करत नाही. कारण मी त्यावर लक्ष केंद्रित केले तर त्याचा माझ्या कामावर परिणाम होईल.”

amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
artificial intelligence use in film
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेचे सिनेअवतार

काही दिवसांपूर्वीच श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला होता. मुंबईतील नामांकित रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. आता श्रेयसच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत असून, त्याने कामावर कमबॅक केले आहे.

हेही वाचा- निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे की सुप्रिया पिळगांवकर? वर्षा उसगांवकरांची जवळची मैत्रीण कोण? अभिनेत्री म्हणाली…

श्रेयसच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, आतापर्यंत मालिका, नाटक, चित्रपट यांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आला आहे. मराठी बरोबरच बॉलीवूडमध्येही त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ओम शांती ओम, हाऊसफुल्ल २, इक्बाल यांसारख्या हिंदी चित्रपटांमधील त्याच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून त्याने मराठी टेलिव्हिजनसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता त्याचा अनोखी गाठ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.