‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेली मालिका ‘आई कुठे काय करते’ प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे. सध्या मालिका अंतिम टप्प्यात आहे. ३० नोव्हेंबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. त्यानिमित्ताने मालिकेतील कलाकार मंडळींसह इतर मंडळी आपल्या आईविषयी व्यक्त होताना दिसत आहेत. नुकतंच अभिनेता सिद्धार्थ जाधवने आईचा एक किस्सा सांगितला.

‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडियावर सिद्धार्थ जाधवचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ जाधवने आईने सांगितलेल्या एका मोलाच्या सल्लाबाबत सांगितलं. सिद्धार्थ म्हणाला, “नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव. आता येत्या ३० नोव्हेंबरला ‘आई कुठे काय करते’ मालिका आपल्या मायबाप रसिक प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. आई विषयी मी खूप बोलतो. ही गोष्ट मला नेहमी सांगावीशी वाटेल. याचा मला अभिमान वाटतो. मी निर्व्यसनी आहे. दारू, सिगारेट पित नाही. याच मुख्य कारण माझी आई आहे.”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…

हेही वाचा – Video: “गळ्यात मंगळसूत्र…”, ‘शाका लाका बूम बूम’ फेम किंशुक वैद्यच्या बायकोने घेतला जबरदस्त उखाणा, पाहा व्हिडीओ

“जेव्हा आम्ही शिवडीला राहत होतो. तेव्हा आम्ही एक नाटक केलं होतं. त्यात दारू पिणाऱ्याची भूमिका केली होती. त्यावेळेस नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर आई खूप घाबरली होती. माझा पोरगा दारू पिऊ आला की काय, असं वाटलं. तेव्हा तिने मला सांगितलं होतं, दारू, सिगारेट प्यायची असेल तर माझा चेहरा डोळ्यासमोर आण. तसंच जेव्हा नकारात्मक विचार डोक्यात येत असतील तेव्हा आमचा चेहरा डोळ्यासमोर आण. हे मी नेहमीच पाळतो,” असं सिद्धार्थ जाधव म्हणाला.

पुढे सिद्धार्थ जाधव म्हणाला, “आपल्या आयुष्यात सर्वात निस्वार्थी नातं आई-वडिलांचं आहे. त्यांची आपल्याकडून कधीच काही अपेक्षा नसते आणि आपल्यासाठी स्वार्थी नातं म्हणजे आपण त्यांना खूप गृहित धरतो. आई-वडील समजून घेतली, असं म्हणतो. आज ‘आई कुठे काय करते’ ही महाराष्ट्राची नंबर वन मालिका. आता याचे अंतिम भाग मी बघणार आहे. तुम्ही पण बघा.”

हेही वाचा – Bigg Boss 18: रजत दलाल आणि दिग्विजय सिंह राठी यांच्या मैत्रीत पडली फूट, पाहा नवा प्रोमो

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता आणि शिवानी सोनार लवकरच अडकणार लग्नबंधनात, बॅचलर पार्टीचे फोटो आले समोर

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिकेची जागा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही नवी मालिका घेत आहे. २ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता ही नवी मालिका सुरू होणार आहे. या नव्या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

Story img Loader