scorecardresearch

‘हर हर महादेव’ नंतर सुबोध भावे नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर शेअर करत म्हणाला…

सुबोध भावे नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

‘हर हर महादेव’ नंतर सुबोध भावे नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर शेअर करत म्हणाला…
सुबोध भावेचा नवीन मराठी चित्रपट. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेता सुबोध भावे अफलातून अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. विविधांगी भूमिका साकारुन त्याने अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटामुळे सुबोध चर्चेत होता. या चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.

‘हर हर महादेव’ नंतर आता पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सुबोध भावे सज्ज झाला आहे. चित्रपटांची मेजवानी घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जानेवारी महिन्यात येऊ घातलेल्या सुबोधच्या ‘वाळवी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्यानंतर सुबोधने आता आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे.

हेही वाचा>> महिलांना कमी लेखणाऱ्या युजरला समांथाचं सडेतोड उत्तर, म्हणाली…

सुबोध भावेने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. ‘फुलराणी’ असं त्याच्या नव्या चित्रपटाचं नाव आहे. “हटके तिची स्टाईल, फाडु तिची स्माईल…बिनधास्त तिची अदा, दुनिया तिच्यावर फिदा..! नव्या वर्षाची Announcement…”, असं कॅप्शन त्याने पोस्टला दिलं आहे. सुबोध भावेच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा>> “मी तयार नव्हते…”, लग्नानंतर महिन्याभरातच पाठकबाईंचा खुलासा

हेही वाचा>> “तिच्यासारख्या अल्पसंख्यांक समुदायातील महिलेला…”, चित्रा वाघ व उर्फी जावेद वादात सुषमा अंधारेंची उडी

‘फुलराणी: अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा सुबोध भावेच्या नवीन चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केलं आहे. हा चित्रपट गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. २३ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 12:33 IST

संबंधित बातम्या