scorecardresearch

“मुंबईच्या ज्या रस्त्यांवरून आजपर्यंत…” अदिती द्रविड रमली जुन्या आठवणीत

ती बहुप्रतीक्षित ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे.

“मुंबईच्या ज्या रस्त्यांवरून आजपर्यंत…” अदिती द्रविड रमली जुन्या आठवणीत

अभिनेत्री अदिती द्रविड हिने आतापर्यंत विविध मालिकांमधून तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. नुकतीच ती ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत झळकली.या मालिकेत तिने नंदिनी हे पात्र साकारलं. आता ती बहुप्रतीक्षित ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. अशातच तिने भावूक होत एक पोस्ट शेअर केली.

अदितीला मनोरंजन सृष्टीत येण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागला आहे. अथक परिश्रमांनंतर आज ती सर्वांच्या ओळखीचा चेहरा बनली आहेत. सध्या ती ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यादरम्यान नुकतीच मुंबईच्या रस्त्यांवर ती एका रॅलीत सहभागी झालेली दिसली. हा अनुभव घेत असताना तिला तिच्या स्ट्रगलच्या दिवसांची आठवण झाली.

आणखी वाचा : “ब्रेकअप झालंय? अबोला धरलाय? मग…”; उर्मिला कानिटकरने शेअर केला व्हिडीओ

अदितीने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले. हे फोटो पोस्ट करताना तिने लिहीलं, “मुंबईच्या ज्या रस्त्यांवरून आजपर्यंत ऑडिशनसाठी स्ट्रगल करत फिरले, त्या रसत्यांवरून स्वतःच्या फिल्मचं प्रमोशन करत फिरले! एकदम B.E.S.T feeling होती! हा दिवस आणि शिवाजी पार्क ते लालबाग – बेस्ट कॉलनीपर्यंतचा प्रवास आयुष्यभर लक्षात राहील!” तिची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे.

हेही वाचा : “कोणालाही कळू न देता मी…” अखेर सायली संजीवने उघड केलं गुपित

‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट २ डिसेंबर २०२२ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, शशांक केतकर, सुहिता थत्ते, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, आदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 17:27 IST

संबंधित बातम्या