अभिनेता अनुषा दांडेकर नेहमीच तिच्या कृतीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. मनोरंजनसृष्टीत अनुषाने आपल्या अभिनयाने आणि गोड गळ्याने वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. गेली अनेक वर्ष हिंदी इंडस्ट्रीत काम करत होती. आता पुन्हा एकदा ती एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आणखी वाचा : विजय देवरकोंडाप्रमाणेच रश्मिका मंदानाचं बॉलिवूड पदार्पणही फ्लॉप? पहिल्या दिवशी ‘गुडबाय’ने कमावले ‘इतके’ कोटी

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Pakistani actor Imran Abbas claims he was offered Aashiqui 2
“आशिकी २, पीके, हीरामंडीची ऑफर मिळाली होती,” पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा; म्हणाला, “महेश भट्ट…”
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती

निर्माते आनंद पंडित आणि पुष्कर जोग यांच्या निर्मिती संस्था अनुक्रमे आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि गूसबम्प्स एंटरटेनमेंट यांनी एकत्रित निर्मित करत असलेल्या चौथ्या चित्रपटाची घोषणा दसरा सणाचे औचित्य साधून सोशल मीडियावर केली. या चित्रपटाचे नाव आहे ‘बाप माणूस.’ या चित्रपटात अनुषा मुख्य भूमिकेत झळकणार आहे, तर तिच्या जोडीला आहे अभिनेता पुष्कर जोग.

दिग्दर्शन योगेश फुलपगार हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाच्या पुष्कर जोग आणि अनुषा दांडेकर यांच्या व्यतिरिक्त कुशल बद्रिके, शुभांगी गोखले आणि बाल कलाकार कीया इंगळे हे महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. नुकतेच या चित्रपटाच्या शूटिंगची लंडनमध्ये सुरुवात करण्यात आली. या महिन्याच्या अखेरीस या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण लंडनमध्ये होणार आहे. पुष्कर जोग आणि अनुषा दांडेकर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. अनुषा बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटात काम करणार आहे.

हेही वाचा : Photos : अनुषा दांडेकरने मुलगी दत्तक घेतलीच नाही, व्हायरल फोटोंमागचं सत्य आलं समोर

याआधी अनुषा ही ‘जय जय महाराष्ट्र माझा’ आणि ‘लालबाग परळ: झाली मुंबई सोन्याची’ या चित्रपटात झळकली होती. मध्यंतरीच्या काळात ती अनेक हिंदी कार्यक्रमांचा भाग बनली. काही शोजचे तिने सूत्रसंचालनही केले. आता अनेक वर्षांनी अनुषा मराठी चित्रपटसृष्टीत काम करणार असल्याने तिचे चाहते खूप आनंदी झाले आहेत.