scorecardresearch

Premium

“तू मला सर्वात…”, दिवंगत बहिणीच्या आठवणीत मराठी अभिनेत्री भावुक, काही महिन्यांपूर्वी झालं निधन

भाग्यश्रीच्या बहिणीचा झाला होता संशयास्पद मृत्यू, फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

Actress Bhagyashree Mote post for late Sister Madhu Markandeya
भाग्यश्रीने शेअर केला बहिणीबरोबरचा फोटो (फोटो भाग्यश्री मोटे इन्स्टाग्राम)

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ‘देवो के देव महादेव’, ‘सिया के राम’, ‘देवयानी’ यांसारख्या मालिकांमधून भाग्यश्रीला लोकप्रियता मिळाली. तिच्या बहिणीचा मार्च महिन्यात संशयास्पद मृत्यू झाला होता. मधू मार्कंडेय असं तिच्या बहिणीचं नाव आहे. ती अभिनेत्री भाग्यश्रीची मोठी बहीण असून विवाहीत होती. बहिणीच्या आठवणीत भाग्यश्रीने तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

नाना पाटेकरांचं खरं नाव माहितीये का? रायगडमध्ये जन्मलेल्या नानांची कौटुंबीक व शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून थक्क व्हाल

Sangram Samel Welcome video
मालिकेसाठी कुटुंब अन् पत्नीपासून ९ महिने दूर होता मराठी अभिनेता; घरी पोहोचताच ‘असं’ झालं स्वागत, शेअर केला व्हिडीओ
south actress sai pallavi
दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवीने लग्नाच्या अफवांवर सोडलं मौन; नाराजी व्यक्त करत म्हणाली…
Bigg boss marathi fame Utkarsh Shinde
“जिच्या पायाला मी स्पर्श करून…” उत्कर्ष शिंदेची अभिनेत्री हर्षदा खानविलकरसाठी खास पोस्ट, म्हणाला…
bollywood actor ranbir kapoor
Video: हॉलीवूड अभिनेत्रीबरोबरच्या ‘त्या’ कृतीमुळे रणबीर कपूर ट्रोल; नेटकरी म्हणाले, “आरकेनं संधी साधली”

फोटोमध्ये भाग्यश्री आणि तिची बहीण दिसत आहेत. दोघी बहिणींचा हा गोड हसरा फोटो शेअर करत भाग्यश्रीने लिहिलं, “तो वेळ पुन्हा रिवाइंड करावा अशी माझी इच्छा आहे! तू मला सर्वात आनंदी ठेवायचीस. तू नेहमी माझ्या हृदयात आहे.” भाग्यश्रीचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस होता. त्यानंतर तिने ही पोस्ट शेअर केली आहे.

तिची बहीण मधू मार्कंडेय ही केक बनवण्याचं काम करायची. व्यवसाय मोठा करण्याच्या उद्देशाने ती आणि तिची मैत्रीण रविवारी भाड्याने रूम बघण्यासाठी गेल्या होत्या. तिथं मधूला अचानक चक्कर आल्याने खाली कोसळली. मधूला तिची मैत्रीण तातडीने खासगी रुग्णालयात घेऊन गेली. तिथून तिला महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे मधूला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress bhagyashree mote post for late sister madhu markandeya hrc

First published on: 28-09-2023 at 08:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×