छोट्या पडद्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखले जाते. ओंकार भोजने हा लवकरच एका मराठी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सरला एक कोटी असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री ईशा केसकरही झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर, पोस्टर आणि गाणी सध्या सुपरहिट ठरताना दिसत आहे. या चित्रपटातील केवडयाचं पान तू या गाण्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या गाण्यातील रोमँटिक सीनवरुन अनेक चर्चा रंगताना दिसत आहे. त्याबद्दल नुकतंच ईशा केसकरने प्रतिक्रिया दिली.

अभिनेत्री ईशा केसकर ही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती सरलाची भूमिका साकारताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या ट्रेलर लाँचवेळी ईशा केसकरने चित्रपटातील विविध गोष्टींबद्दल भाष्य केले. त्यावेळी तिला या चित्रपटातील रोमँटिक सीनबद्दल विचारण्यात आले. हे दृश्य तू कसे शूट केले? यावरही तिने भाष्य केले.
आणखी वाचा : “तो पैशासाठी गेला…” ओंकार भोजनेच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मागील एक्झिटचं खरं कारण समोर

bjp manifesto titled modi ki guarantee
समोरच्या बाकावरून : खोटी खोटी गॅरंटी..
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत

“केवड्याचं पान तू हे गाणं अतिशय चांगले झालं आहे. हे गाण शूट करताना एक वेगळी जबाबदारी होती. याआधी मी कधीही रोमँटिक सीन किंवा दृश्याचे सीन शूट केले नव्हते. पण मग त्यावेळी मी माझी आणि ओंकारच्या मैत्रीचा आधार घेतला. मग ते गाणं शूट केलं”, असे ईशा केसकरने म्हटले.

“मोठ्या पडद्यावर ते कसं दिसेल याबद्दल आम्ही अजिबात विचार केला नाही. जर आम्ही तो केला असता तर कदाचित आम्हाला दडपण आलं असतं. आम्ही एकमेकांचे हात धरले, मित्रा असं म्हटलं आणि त्यानंतर ते गाणे शूट केलं”, असे ईशा केसकर म्हणाली.

आणखी वाचा : हातात पत्ते, समोर दारुची बाटली अन्… ओंकार भोजनेच्या नव्या लूकनं वेधलं लक्ष

दरम्यान सानवी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि आरती चव्हाण यांची निर्मित “सरला एक कोटी’’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘आटपाडी नाईट्स’चे नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी केले आहे. तर विनोद नाईक कार्यकारी निर्माते आहेत. हा चित्रपट येत्या २० जानेवारी २०२३ ला प्रदर्शित होणार आहे.