actress manasi naik on her marriage life said i totally behaved as a wife | Loksatta

“मी शेवटपर्यंत पत्नीधर्म निभावला पण…” मानसी नाईकचा वैवाहिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

मानसी नाईकने वैवाहिक आयुष्याबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत

manasi naik on her marriage life
मानसी नाईक वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेत वेगळी होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मानसीच्या वैवाहिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत. मानसीने नुकतीच एका मुलाखतीदरम्यान तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत भाष्य केलं आहे.

मानसी नाईकने नुकतंच ‘ईसकाळ’ला मुलाखत दिली. मानसी म्हणाली, “प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की आपण लग्न करावं. एक राजकुमार आपल्या आयुष्यात असावा. मी खूप रोमॅंटिक आहे. मी प्राणीप्रेमीही आहे. मला लोकांना मदत करायला आवडतं. मी स्वामीभक्तही आहे. मला प्रेम हवं होतं. कुटुंब हवं होतं, म्हणून मी लग्न केलं”.

हेही वाचा>> मानसी नाईकचे पती प्रदीप खरेरावर गंभीर आरोप, म्हणाली “पैसे व प्रसिद्धी मिळवण्यासाठी…”

हेही वाचा>> “मन भरलं म्हणून…” घटस्फोटाच्या चर्चांवरुन ट्रोल करणाऱ्यांना मानसी नाईकचे सडेतोड उत्तर

“लग्नानंतर माहेर व सासर अशा दोन्हीबाजूच्या संस्कृती सांभाळण्याचा मी प्रयत्न केला. मी शेवटपर्यंत पत्नीधर्म निभावला. समाजात मी ताठ मानेने जगू शकेन असं वागली आहे. पण तरीही घटस्फोटाच्या बातमीनंतर मराठीचं लोक माझ्या पोस्टवर कमेंट करुन मला ट्रोल करत आहेत, याचं मला वाईट वाटतं. मी तुमचीच बहीण, मैत्रीण आहे”, असंही पुढे मानसी म्हणाली.

हेही वाचा>> “अंड्याची भुर्जी अन्…” राखी सावंतसह तीन सदस्यांची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दणक्यात एन्ट्री

मानसी नाईक व प्रदीप खरेरा यांनी जानेवारी २०२१मध्ये लग्नगाठ बांधली. सुरुवातीला त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. परंतु, आता अचानक संसारात वादळ आल्यामुळे अवघ्या दीड वर्षातच मानसीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 13:18 IST
Next Story
“विक्रम गोखले व माझे वडील भाऊ नव्हते आणि…” चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर सखी गोखले संतापली