Manasi Naik Post: अभिनेत्री मानसी नाईक आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत असते. प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेतल्यानंतर मानसी सकारात्मकता पसरवणाऱ्या पोस्ट खूपदा शेअर करत असते. दोन दिवसांपूर्वी मानसीचा पूर्वाश्रमीचा पती प्रदीप खरेराने साखरपुडा केला. याचदरम्यान मानसीने स्वतःचे मराठी लूकमधील काही सुंदर फोटो शेअर केले. या फोटोंच्या कॅप्शनने लक्ष वेधून घेतले आहे.
मानसीने पिवळी काठापदराची साडी नेसून, हातात हिरवा चुडा घालून सुंदर फोटोशूट केले आहे. या लूकमधील काही फोटो शेअर करत सिंगल असण्यासाठी खूप धाडस असावे लागते, असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
पूर्वाश्रमीच्या पतीच्या साखरपुड्यानंतर मानसी नाईकची पहिली पोस्ट, शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
मानसी नाईकने कॅप्शनमध्ये काय म्हटलं आहे?
“आपल्याला काहीतरी मिळत आहे असे म्हणून कोणत्याही गोष्टीवर सेटल होणाऱ्या लोकांच्या या जगात सिंगल राहण्यासाठी खूप धाडस असावे लागते.
आयुष्यात, Prayer (प्रार्थना), Priorities (प्राधान्यक्रम), Peace(शांतता), Positivity (सकारात्मकता), Patience (संयम) या ‘P’ वर ठाम राहा.
जोपर्यंत तुम्हाला साजेसं कोणी भेटत नाही तोपर्यंत सिंगल राहा, सेटल होऊ नका.
प्रेमाची आशा ठेवा, प्रेमासाठी प्रार्थना करा, प्रेमाची स्वप्ने पाहा, पण प्रेमाची वाट पाहण्यात तुमचं आयुष्य थांबवू नका.
चुकीच्या व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा सिंगल राहणं कधीही चांगलं आहे.
या वर्षी मी हरले, जिंकले, अपयशी झाले, रडले, हसले, प्रेम केले, पण मी झुकले नाही. कणखर स्त्रिया कधीही हार मानत नाहीत.
आपल्याला कदाचित कॉफी घ्यावी वाटेल, थोडं रडावं वाटेल किंवा एखादा दिवस काहीच काम न करता अंथरुणात घालवावा वाटेल. मात्र, यानंतर कणखर स्त्रिया आणखी सशक्त होऊन परततात.
मी माझ्या वेदना एखाद्या देवीप्रमाणे सहन केल्या. मी कधीही मागे वळून पाहत नाही, मी कधीही हार मानणार नाही… कधीही नाही. चीयर्स टू बीइंग मी,” असं कॅप्शन मानसीने फोटोंना दिलं आहे.
मानसीच्या या पोस्टवर कमेंट करून चाहते तिचे कौतुक करत आहेत. अनेकांनी यावर रेड हार्ट इमोजी कमेंट केले आहेत.
मानसी नाईकचा घटस्फोट
मानसी नाईक व प्रदीप खरेरा यांनी जानेवारी २०२१ मध्ये लग्न केलं होतं. सुरुवातीला दोघांच्याही वैवाहिक आयुष्यात सर्वकाही सुरळीत सुरू होतं, पण नंतर मात्र या दोघांमध्ये बिनसलं व काही काळाने त्यांच्या घटस्फोटाची बातमी आली. मानसी व प्रदीप अवघ्या दीड वर्षात विभक्त झाले.
प्रदीप खरेराने केला साखरपुडा
मानसी नाईकचा पूर्वाश्रमीचा पती प्रदीप खरेरा बॉक्सर व सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे. तो मॉडेलिंग क्षेत्रातही काम करतोय. त्याने सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर विशाखा जाटनी हिच्याशी साखरपुडा केला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd