actress manasi naik replied to trollers for commenting on her marriage life divorce news | Loksatta

“मन भरलं म्हणून…” घटस्फोटाच्या चर्चांवरुन ट्रोल करणाऱ्यांना मानसी नाईकचे सडेतोड उत्तर

मानसी नाईकने घटस्फोटाच्या चर्चांवरुन ट्रोल करणाऱ्यांची कानउघाडणी केली आहे.

“मन भरलं म्हणून…” घटस्फोटाच्या चर्चांवरुन ट्रोल करणाऱ्यांना मानसी नाईकचे सडेतोड उत्तर
मानसी नाईकने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. (फोटो: मानसी नाईक/ इन्स्टाग्राम)

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत. पती प्रदीप खरेरापासून वेगळं होण्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मानसीला अनेकांनी ट्रोल केलं आहे. मानसीने या ट्रोलर्सला स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे.

मानसी नाईकने नुकतीच ‘ईसकाळ’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत मानसीने वैवाहिक आयुष्यावर भाष्य केलं आहे. मानसी म्हणाली, “घटस्फोटाच्या चर्चांनंतर माझ्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये अनेकांनी कमेंट केल्या आहेत. हिरोईनचं मन भरलं, समोरच्याचे पैसे संपले. नवरा काही कमवत नाही, मग आता यांची लाइफस्टाइल कशी चालणार, अशा कमेंट माझ्या पोस्टवर आहेत”.

हेही वाचा>> मानसी नाईकचे पती प्रदीप खरेरावर गंभीर आरोप, म्हणाली “पैसे व प्रसिद्धी मिळवण्यासाठी…”

हेही वाचा>> “मुलींना मेसेज करता तेव्हा त्यांचे कपडे…” चेतन भगत यांच्या वक्तव्यानंतर उर्फी जावेद संतापली

“मी या माध्यमातून प्रेक्षकांना सांगू इच्छिते की, समोरच्याचा पैसा संपला म्हणून मी पतीला सोडलेलं नाही. त्यामुळे तुमचा हा गैरसमज दूर करा. विशेष म्हणजे ट्रोल करणारी सगळी मराठी माणसं आहेत. अशी कमेंट करणारी एकही अमराठी व्यक्ती नाही. मी तुमचीच बहीण, मैत्रीण आहे”, असं म्हणत मानसीने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

हेही वाचा>> ‘अ‍ॅव्हेंजर्स’ सीरिजच्या निर्मात्याबरोबर राजामौली काम करणार? म्हणाले “मला हॉलिवूडमध्ये…”

मानसी नाईकने बॉक्सर व मॉडेलिंग करत असलेल्या प्रदीप खरेराशी जानेवारी २०२१मध्ये लग्नगाठ बांधली. आता अवघ्या दोन वर्षातचं मानसीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 16:22 IST
Next Story
Video : अशोक सराफ यांनी ‘धुमधडाका’मध्ये परिधान केलेला शर्ट श्रेयस तळपदेनेही घातला अन्…; अभिनेत्याने शेअर केला ‘त्या’ सीनचा व्हिडीओ