scorecardresearch

मानसी नाईकचे पती प्रदीप खरेरावर गंभीर आरोप, म्हणाली “पैसे व प्रसिद्धी मिळवण्यासाठी…”

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मानसी नाईकचं पती प्रदीप खरेराबाबत गंभीर वक्तव्य

मानसी नाईकचे पती प्रदीप खरेरावर गंभीर आरोप, म्हणाली “पैसे व प्रसिद्धी मिळवण्यासाठी…”
मानसी नाईकने प्रदीप खरेरावर केले गंभार आरोप.(फोटो: मानसी नाईक/ इन्स्टाग्राम)

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेत वेगळी होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मानसीच्या वैवाहिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत. मानसीने एका मुलाखतीदरम्यान प्रदीप खरेराबद्दल वक्तव्य केलं आहे.

मानसी नाईकने नुकतंच ‘ईसकाळ’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत मानसीने वैवाहिक आयुष्यावर भाष्य करत पती प्रदीप खरेरावर गंभीर आरोप केले आहेत. मानसी म्हणाली, “घटस्फोटाच्या चर्चांनंतर ‘तुला आधी कळलं नाही का तो कसा आहे’, असं अनेक जण मला विचारत आहेत. यावर मी बोलू इच्छिते. लग्नाआधी आम्ही लिव्ह इनमध्ये राहत होतो. तेव्हा करोनाचा काळ सुरू होतो. त्यामुळे सगळेच एकमेकांशी चांगलंच वागत होते”.

हेही वाचा>> “नट विस्मरणात जातो पण…” विक्रम गोखले यांच्या निधनानंतर अभिनेत्रीने शेअर केला ‘नटसम्राट’मधील व्हिडीओ

हेही वाचा>> “तिचे फोटो लोक रात्री बिछान्यात…” चेतन भगत यांचं उर्फी जावेदबाबत गंभीर वक्तव्य

“काही लोक फक्त पैसे व प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोकप्रिय व्यक्तींशी संबंध जोडतात. जोपर्यंत त्यांच्याकडून पैसे मिळत आहेत, तोपर्यंत त्यांना लुटतात. असंच काहीसं माझ्या बाबतीतही झालं आहे. सध्या माझ्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही. पण या सगळ्या गोष्टी मला बाहेर आणायच्या आहेत आणि त्या मी आणेन”, असंही पुढे मानसी म्हणाली.

हेही वाचा>> विक्रम गोखले यांना अमिताभ बच्चन यांच्यामुळे मिळालं मुंबईत घर, स्वत:च सांगितलेला किस्सा

मानसी नाईकने बॉक्सर व मॉडेलिंग करत असलेल्या प्रदीप खरेराशी जानेवारी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. आता अवघ्या दोन वर्षातचं मानसीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 12:12 IST

संबंधित बातम्या