scorecardresearch

“बायको नवऱ्याला छळत…”, मानसी नाईकने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मानसी नाईकने शेअर केला व्हिडीओ

“बायको नवऱ्याला छळत…”, मानसी नाईकने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत
मानसी नाईकने शेअर केला व्हिडीओ. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसी पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेत वेगळी होणार आहे. वैवाहिक आयुष्यात वादळ आल्यामुळे हा निर्णय घेतलं असल्याचं मानसीने सांगितलं होतं.

ठसकेबाज लावणी व दिलखेचक अदांनी प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी मानसी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. मानसी इन्स्टाग्राम लाइव्ह व सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहते. अनेक फोटो व व्हिडीओही ती शेअर करताना दिसते. मानसीने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा>> “तिला तुरुंगात…”, उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांचं विधान

हेही वाचा>> वनिता खरात व रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

मानसीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. चंद्रकोर व नथ घालून तिने पारंपरिक लूक केला आहे. या रील व्हिडीओमध्ये मानसी “जी बायको नवऱ्याला छळत नाही, तिला संसारातलं काही ढेकळं कळत नाही”, असं म्हणताना दिसत आहे. मानसीचा हा मजेशीर रील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> “देवेंद्रजी, बायकोला मराठी बोलायला…”, मकर संक्रांतीच्या शुभेच्छांवरून अमृता फडणवीस ट्रोल

मानसी व प्रदीप १९ जानेवारी २०२१ रोजी विवाहबद्ध झाले होते. प्रदीप हा पेशाने बॉक्सर असून तो मॉडेलिंग क्षेत्रातही त्याचं नशीब आजमावत आहे. घटस्फोटाच्या चर्चांनंतर मानसी व प्रदीपची सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत जुगलबंदी सुरू आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 18:28 IST

संबंधित बातम्या