scorecardresearch

Premium

Video : “माझ्या पायात जोडवी…”, सासूबाईंच्या लग्नात मिताली मयेकर झाली भावुक, शेअर केला ‘त्या’ खास क्षणाचा व्हिडीओ

Video : मिताली मयेकरने शेअर केला सासूबाईंच्या दुसऱ्या लग्नातील खास व्हिडीओ, म्हणाली…

mitali mayekar shared beatiful moment of her mother in law seema chandekars second marriage
मिताली मयेकरने शेअर केला सासूबाईंच्या दुसऱ्या लग्नातील व्हिडीओ

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांची जोडी मनोरंजनविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. सध्या दोघेही एका त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एका सकारात्मक गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. सिद्धार्थ-मितालीचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. दुसऱ्या लग्नासाठी सिद्धार्थने आपल्या आईला आणि मितालीने लाडक्या सासूबाईंना खंबीरपणे पाठिंबा दिला. नुकतीच दोघांनीही सीमा चांदेकर यांच्या दुसऱ्या लग्नाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. आता मितालीने या लग्नसोहळ्यातील भावुक क्षण इन्स्टाग्रामवर व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला आहे.

हेही वाचा : Video : ‘सुभेदार’ चित्रपटाची भारी कामगिरी! पुण्यात पोस्टरवर केला दुग्धाभिषेक, चिन्मय मांडलेकरने शेअर केला व्हिडीओ

Marco Troper death
यूट्यूबच्या माजी सीईओंच्या मुलाचा वसतीगृहात आढळला मृतदेह, कारण अद्याप अस्पष्ट
satyashodhak kamaltai vichare, satyashodhak kamaltai vichare information in marathi,
स्त्रियांच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या सत्यशोधक कमलताई विचारे
Vijay Wadettivars reaction to Ashok Chavan join BJP
चव्हाणांच्या पक्षांतरावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “एक व्यक्ती गेला म्हणजे…”
Womens Health is there possible to normal delivery after one seizure
स्त्री आरोग्य : एकदा ‘सिझर’ झाल्यावर दुसऱ्यावेळी नॉर्मल प्रसूती होते का?

मितालीने यापूर्वी सासूबाईंच्या लग्नातील काही निवडक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आता अभिनेत्रीने शेअर केलेल्या नव्या व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सासूच्या लग्नसोहळ्यातील जोडवी घालताना क्षण मितालीने व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला आहे. दोघींच्या गोड नात्याची झलक या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video: ‘सुभेदार’बद्दल प्रेक्षकांच्या ‘त्या’ कृतीमुळे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर नाराज; म्हणाले, “तुम्ही सगळे…”

सीमा चांदेकर या व्हिडीओमध्ये मितालीच्या लग्नात मी तिच्या पायात जोडवी घातली होती…आज ती माझ्या पायात जोडवी घालणार असं बोलताना दिसत आहेत. सासूच्या पायात जोडवी घालताना मिताली भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर ‘किती गोड’, ‘सुंदर’, ‘अशी सूनबाई सर्वांना मिळावी’ अशा कमेंट्स अभिनेत्रीचं कौतुक करत केल्या आहेत.

हेही वाचा : हेमा मालिनींनी सांगितलं करण देओलच्या लग्नाला न जाण्याचं कारण; दोन्ही कुटुंबातील मतभेदांबद्दल म्हणाल्या, “सनी व बॉबी…”

मिताली मयेकरने या व्हिडीओला “माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण” असं कॅप्शन दिलं आहे. यापूर्वी सासूबाईंच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो शेअर करत मितालीने त्यांना खंबीरपणे साथ दिली होती. “आम्ही मुलं तुझ्यासोबत आहोतच. तुला आणि नितिन काकांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम.” असं अभिनेत्रीने म्हटलं होतं. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या नव्या व्हिडीओवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress mitali mayekar shared beatiful moment of her mother in law seema chandekars second marriage sva 00

First published on: 25-08-2023 at 19:55 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×