scorecardresearch

Video: “दारू जास्त प्यायली आहे मॅडमनी…” ‘त्या’ कृतीमुळे नेहा पेंडसेवर नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

नुकताच तिने तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला जो चांगलाच चर्चेत आला आहे.

neha pendse (2)

अभिनेत्री नेहा पेंडसे हिने मराठीबरोबरच हिंदी मनोरंजनसृष्टीतही स्वतःची ओळख निर्माण केली. आतापर्यंत तिने अनेक मराठी, हिंदी, दक्षिणात्य चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती मालिका, चित्रपट यांपासून थोडी दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांशी संपर्कात असते. आता नुकताच तिने तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला, जो चांगलाच चर्चेत आला आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती विविध पोस्ट शेअर करून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. पण आता तिने पोस्ट केलेला एक व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेला नाही. तिने केलेली कृती पाहून सोशल मीडियावर नेटकरी तिच्याबद्दल संताप व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा : Video : चॅलेंज पूर्ण करण्याच्या नादात पडता पडता वाचली नेहा पेंडसे, व्हिडीओ व्हायरल

नेहाने नुकताच तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये ती एका रेस्टॉरंटमध्ये दिसत असून तिने हातामध्ये काही प्लेट्स एकावर एक ठेवल्या आहेत. तर दुसऱ्या हातात पकडलेली प्लेट इतर प्लेटवर आपटून ती सर्व प्लेट्स फोडत आहे. ही गोष्ट ती अत्यंत एन्जॉय करत करताना दिसत आहे. पण तिचं हे वागणं पाहून नेटकरी चांगलेच नाराज झाले आहेत.

हेही वाचा : “मी कुठे व्हर्जिन…” दोन वेळा घटस्फोट झालेल्या पुरुषाबरोबर लग्न केल्यानंतर नेहा पेंडसेचा गौप्यस्फोट

या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिलं, “तुझ्याकडे पैसे जास्त झाले असतील तर ही फालतू कामं बंद करून थोडं डोनेशन कर.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “आता हे सगळं साफ कोण करणार?” तर आणखी एकाने लिहिलं, “हे असं करण्याची काहीही आवश्यकता नाहीये. हे सगळं तू साफ करणार आहेस का? उगाचच दुसऱ्यांची काम का वाढवतेस?”

तर आणखी एक जण म्हणाला, “नशा जास्त झाली का?” तर एकाने लिहिलं, “दारू जास्त प्यायली आहे मॅडमनी.” याचबरोबर- “तू आपल्या परंपरा पाळायला हव्यास, दक्षिणात्य परंपरा नाही. भारतीय असण्याचा अभिमान बाळग,” असंही एकाने लिहीलं. त्यामुळे आता नेहा या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 17:53 IST

संबंधित बातम्या