अभिनेत्री पूजा सावंत ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मराठी बरोबरच तिने हिंदी सिनेसृष्टीतही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. आतापर्यंत तिचं नाव वैभव तत्त्ववादी आणि भूषण प्रधान बरोबरही जोडले गेले आहे. पण या दोघांबरोबर तिचं नातं कसं आहे हे तिने आता स्पष्ट केलं आहे. वैभव, पूजा आणि भूषण एकमेकांचे खूप चांगले मित्र-मैत्रिण आहेत. गेली अनेक वर्षं त्यांची मैत्री आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये देखील ते एकत्र दिसतात. तर आता 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत पूजाने त्या तिघांच्या मैत्रीबद्दल भाष्य केलं. आणखी वाचा : पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा? चर्चांबाबत मौन सोडत म्हणाली, “ती अंगठी…” ती म्हणाली, "भूषण आणि वैभव माझे रिॲलिटी चेक आहेत. ते दोघेही मला वेळोवेळी रिॲलिटी चेक देतात. कारण मी खूप ड्रीमगर्ल किंवा स्वप्नांच्या दुनियेमध्ये राहणारी मुलगी आहे. मला स्वप्न बघायला खूप आवडतात. पण माझे हे दोन असे मित्र आहेत ते मला नेहमी खऱ्याची जाणीव करून देतात आणि त्याचा मला खूप फायदा होतो. करिअरच्या बाबतीत, रिलेशनशिपच्या बाबतीत किंवा आणि कुठल्याही गोष्टीत या क्षणाला मला काय करायचं आहे हे ते मला सांगतात." हेही वाचा : वैभव तत्त्ववादीने लग्न करण्याबद्दल केलं भाष्य; म्हणाला, “मला जे विचारतात…” पुढे ती म्हणाली, "वैभवकडून मी स्पिरिच्युअल गोष्टी शिकले आहे. तर भूषणकडून मला सोशल मीडियाचा वापर कसा योग्य प्रकारे करायचा हे शिकायला मिळतं. कारण या क्षेत्रात सोशल मीडिया हा खूप महत्त्वाचा भाग आहे. पण भूषण त्याकडे वाहवतही जात नाही. त्यामुळे आमच्या तिघांमध्ये सोशल मीडियाचा वापर कसा करावा हे भूषणला खूप चांगलं माहित आहे. त्यामुळे या दोघांकडूनही मला नेहमीच रिॲलिटी चेक मिळत असतो."