scorecardresearch

Premium

सांगली ते मुंबई, सई ताम्हणकरच्या ११ व्या घरासाठी प्रिया बापटने शेअर केली खास पोस्ट; म्हणाली, “कष्ट, प्रेम अन्…”

सई ताम्हणकरने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, प्रिया बापट शुभेच्छा देत म्हणाली…

actress priya bapat wishes sai tamhankar for new house
प्रिया बापटने सई ताम्हणकरला दिल्या शुभेच्छा

सई ताम्हणकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनेत्रीने मराठीसह बॉलीवूडमध्येही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सईने नुकतंच मुंबईत स्वत:चं पहिलं आलिशान घर खरेदी केलं आहे. मूळची सांगलीची असलेली सई ताम्हणकर आता खऱ्या अर्थाने मुंबईकर झाली आहे. नव्या घराबरोबरच तिने नुकतंच तिचं युट्यूब चॅनेल सुद्धा सुरु केलं आहे. या युट्यूब चॅनेलवर सईने तिच्या आलिशान घराची पहिली झलक शेअर केली आहे. या व्हिडीओवर सध्या मराठी विश्वातील कलाकार कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री प्रिया बापटने सईसाठी खास पोस्ट शेअर करत तिचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा? ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण, नेटकरी म्हणाले…

sai tamhankar
“मला अजूनही हे घर…” सई ताम्हणकरचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाली “उद्या…”
rakhi sawant
Video: आता ड्रामा क्वीन राखी सावंतवर येणार बायोपिक; स्वतः केलं जाहीर, म्हणाली, “आलिया भट्ट आणि विद्या बालन…”
rasika-vengurlekar
“पहाटे साडेपाच वाजता उठून…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रसिका वेंगुर्लेकरने सांगितला अनुभव, म्हणाली “माझा नवरा घाबरुन…”
avinash narkar and aishwarya narkar
“डान्स करणं हा माझ्यासाठी फोबिया होता पण…”, ऐश्वर्या नारकर यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाल्या,”हे त्या लोकांसाठी…”

सई ताम्हणकर आणि प्रिया बापट या दोघीही सध्या मराठी कलाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. या दोघीही एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे प्रियाने लाडक्या मैत्रिणीला नव्या घरासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. सई तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी २००५ मध्ये मुंबईत आली. सांगलीत तिचं संपूर्ण बालपण गेलं. तेव्हापासून सई आई-बाबांच्या, नातेवाईकांच्या आणि भाड्याच्या अशा एकूण १० घरांमध्ये राहिली. त्यामुळे नव्या घराला अभिनेत्रीने ‘माय इलेव्हन्थ प्लेस’ असं नाव दिलं आहे.

हेही वाचा : ‘जब वी मेट’ चित्रपटात चष्मा लावण्यासाठी शाहिद कपूरने केलेलं भांडण; म्हणाला, “आधी निर्मात्यांना…”

सई ताम्हणकरच्या सांगली ते मुंबई या प्रवासातील अकराव्या आणि हक्काच्या पहिल्या घरासाठी शुभेच्छा देत प्रिया बापट लिहिते, “कष्ट, प्रेम, जिव्हाळा आणि प्रचंड इच्छा शक्तीने तू हे घर बनवलं आहेस. स्वप्न, आकांक्षा, आशीर्वाद आणि महत्वाकांक्षेने परिपूर्ण अशी ही जागा…तुझं नवं घर अगदी तुझंच मूर्त स्वरूप आहे. सई तुझं खूप खूप अभिनंदन आणि तुला भरपूर प्रेम!” प्रियाची ही पोस्ट सईने रिशेअर केली आहे.

हेही वाचा : Bigg Boss 17: अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी ‘बिग बॉस सीझन १७’चं दार उघडणार, सलमान खानने नव्या प्रोमोमधून केलं जाहीर

sai tamhankar new house
सई ताम्हणकरने घेतलं नवीन घर

दरम्यान, सई ताम्हणकरने शेअर केलेल्या नव्या घराच्या व्हिडीओमध्ये वॉकिंग वॉर्डरोब, प्रशस्त खोल्या, सुंदर व्ह्यू, आकर्षक फर्निचरची झलक पाहायला मिळत आहे. या घरासंदर्भातील प्रत्येक अपडेट अभिनेत्री तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर करत असते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress priya bapat wishes sai tamhankar for new house and shared beautiful post sva 00

First published on: 24-09-2023 at 13:23 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×