Rinku Rajguru Shares Sairat Casting Story : कुठं आहे तो नागराज मंजुळे?… ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासमोर बसूनच आर्ची म्हणजेच रिंकूने त्यांना हा प्रश्न विचारला होतं. याबद्दल रिंकूनं स्वत:च नुकत्याच एका मुलाखतीत खुलासा केला आहे. सैराटच्या या कास्टिंगचा मजेशीर किस्सा रिंकूने शेअर केला आहे.

मराठी सिनेसृष्टीला नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ सिनेमाने मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले. आतापर्यंतचे शक्य झालं नाही ते या सिनेमाने करून दाखवलं होतं. या सिनेमामुळे प्रत्येक कलाकाराला भरपूर ओळख अन् प्रसिद्ध मिळवून दिली. त्या कलाकारांचे चाहते निर्माण झाले जे आजतागायत आहेत. या कलाकारांच्या नशीबात हे भाग्य आलं ते नागराज मंजुळे यांच्यामुळे.

नागराज मंजुळे यांनी अनेक नवख्या कलाकारांना संधी दिली. त्यांनी अशीच संधी दिली ती रिंकू राजगुरूला दिली, ज्याचं तिने सोनं केलं पण तुम्हाला महितीय का, नागराज यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीचा एक मजेशीर किस्सा आहे, जो रिंकूने पहिल्यांदाच हा किस्सा शेअर केला.

“राष्ट्रीय पुरस्कार विजेता गावात आला आहे त्याला…”

मित्रम्हणेच्या मुलाखतीत रिंकू म्हणाली, “मी त्यांना आकलूजमध्ये भेटले होते. ते ऑडिशनसाठी भेटले होते. ते तिकडे आले तेव्हा मी त्यांना भेटायला गेली होती. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आले म्हणून त्यांना भेटायला गेली होती. तेव्हा मी १३ वर्षांची होती. मला फक्त त्यांना बघायचं होतं. माझ्या गावात कुणीतरी आलं आहे, मला शाळा बुडवायची आहे आणि एक राष्ट्रीय पुरस्कार विजेता गावात आला आहे तर त्याला बघायला जायचंय. तेव्हा माझ्या डोक्यात फक्त एवढंच होतं.”

रिंकू राजगुरू म्हणालेली “कुठं आहे तो नागराज मंजुळे?”

यानंतर तिने सांगितलं, “मी आई-वडिलांबरोबर गेले होते. तेव्हा ते म्हणाले, ‘इथे ऑडिशन आहे. तू जाऊन भेट.’ खाली कॅफे होता. तिथे एका खुर्चीवर बसले आणि समोर बसलेल्या एका माणसाला विचारलं, ‘कुठं आहे तो नागराज मंजुळे?’ त्यावर तो माणूस म्हणाला, ‘मीच आहे बोल…’ मग त्यांनी मला ऑडिशनसाठी विचारलं. मी म्हटलं, ‘मला यातलं काही येत नाही.’ मग त्यांनी विचारलं, ‘काय येतं?’ त्यावर मी म्हणाले, ‘आता गॅदरिंगच्या स्पर्धा सुरू आहेत, देवा श्रीगणेशा वर नाचायला येतं.’ पुन्हा ते अजय-अतुल यांचंच गाणं होतं. मग त्यावर नाचले. तो इतका सहज संवाद होता.”

दरम्यान, रिंकूच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने सैराटनंतर ‘कागर’,’ झुंड’, ‘मेकअप’, ‘झिम्मा २’ अशा लोकप्रिय सिनेमातून प्रेक्षकांच मनोरंजन केलं आहे. नुकतीच ती ‘आशा’ या सिनेमातसुद्धा झळकली. तर लवरकच ती ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात तिच्यासह अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव अशी कलाकार मंडळी आहेत.