scorecardresearch

Premium

आतापर्यंत वेब सिरीजमध्ये का दिसली नाहीस? सोनाली कुलकर्णीने दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाली, “कुटुंबीयांबरोबर बसून…”

अनेक लोकप्रिय मराठी कलाकार ओटीटीवर पदार्पण करत असतानाच सोनालीने मात्र अजून या माध्यमात काम केलेलं नाही. याचं कारण आता तिने स्पष्ट केलं आहे.

sonaleekulkarni-new

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. गेली अनेक वर्ष ती वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ओटीटी हे एक लोकप्रिय माध्यम म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. अनेक लोकप्रिय मराठी कलाकार ओटीटीवर पदार्पण करत असतानाच सोनालीने मात्र अजून या माध्यमात काम केलेलं नाही. याचं कारण आता तिने स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा : “सेक्सचा विचार करत आहे…”, नेटकऱ्याच्या उत्तराने सोनाली-प्रार्थना थक्क, दोघींनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

Shefali
Video: शेफाली शाहने पाहिलं रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वेचं ‘चारचौघी’ नाटक, मराठीत प्रतिक्रिया देत म्हणाली, “सगळ्या कलाकारांची कामं…”
priya bapat shared romantic photo
“सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त केलेलं…” प्रिया बापटने शेअर नवऱ्याला किस करतानाचा फोटो, नेटकरी म्हणाले…
bhau kadam
“विनोदी अभिनेता हा शिक्का…” भाऊ कदम यांचे स्पष्ट वक्तव्य, म्हणाले “अनोळखी प्रेक्षकांनाही…”
bhushan mahesh
“ते खूप…”, भूषण प्रधानने उलगडला महेश मांजरेकरांचा खऱ्या आयुष्यातील स्वभाव, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

सोनाली आत्तापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये झळकली. तर नटरंग या चित्रपटाने तिला वेगळी ओळख मिळवून दिली. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे ती आता कोणत्या नवीन कलाकृतीमध्ये दिसणार हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. चित्रपटांमध्ये नाव मिळवल्यानंतर ती वेब सिरीजमध्ये कधी काम करणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. तर आता याबाबत तिने भाष्य केलं आहे.

हेही वाचा : “आम्ही जिथे जातो तिथे…”; दुबईत दिवाळी साजरी करण्यावरून टोमणे मारणाऱ्यांना सोनाली कुलकर्णीचे सडेतोड उत्तर

त्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, “वेब सिरीजमध्ये जर एखादी चांगली भूमिका मिळाली तर मी ती नक्कीच करेन. मी माझ्या कुटुंबीयांबरोबर बसून जे पाहू शकेन अशा कलाकृतीत काम करायचं असं मी आधीपासूनच ठरवलं आहे आणि हे तत्त्व मी करिअरच्या सुरुवातीपासूनच पाळलं आहे. आजपर्यंत मला चांगल्या भूमिका मिळत आल्या. इथून पुढेही वेगळं काम करण्यावरच माझा भर असेल.” तर आता सोनालीचं हे बोलणं चर्चेत आलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress sonali kulkarni revealed why she has not worked in web series yet rnv

First published on: 22-09-2023 at 12:36 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×