actress sonali kulkarni shared new horrer filter for her upcoming film spg 93 | 'या' भयावह चेहऱ्यामागच्या अभिनेत्रीला ओळखलंत का? व्हिडीओ बघून चाहत्यांनाही धडकी भरली | Loksatta

‘या’ भयावह चेहऱ्यामागच्या अभिनेत्रीला ओळखलंत का? व्हिडीओ बघून चाहत्यांनाही धडकी भरली

अभिनेता विराजस कुलकर्णी हा या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण करत आहे

‘या’ भयावह चेहऱ्यामागच्या अभिनेत्रीला ओळखलंत का? व्हिडीओ बघून चाहत्यांनाही धडकी भरली
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

हॉलिवूड, बॉलिवूडप्रमाणे आता मराठी चित्रपटसृष्टीत आता भयपट येऊ लागलेत. कौटूंबिक, सामाजिक विषयांवर भाष्य करणारे चित्रपट म्हणून मराठी चित्रपटांकडे बघितले जाते. सध्या मराठीत एका भयपटाची चर्चा आहे. ‘व्हिक्टोरिया’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाच्या कलाकारांचा फर्स्टलूक समोर आला होता. तसेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. यातील अभिनेत्रीने नुकताच तिचा एक लूक इन्स्टाग्राम शेअर केला आहे. ती अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. भयावह चेहऱ्याचा फिल्टर लावून तिने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच तिने पोस्टमध्ये हा फिल्टर तिच्या चाहत्यांना वापरण्यास सांगितला आहे.

‘अग्निहोत्र’ मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; प्रेक्षकांना पाहता येणार संपूर्ण भाग

‘व्हिक्टोरिया’ नावाच्या एका आलिशान हॉटेलात एका महिलेचा मृत्यू होतो. सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी हे दोघे हॉटेलमध्ये राहायला जातात आणि या कथेतील थरार सुरू होतो. चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘व्हिक्टोरिया’ हा चित्रपट येत्या १६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग तसेच आशय कुलकर्णी हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेता विराजस कुलकर्णी हा या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. विराजस आणि जीत अशोक यांनी मिळून या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 15:58 IST
Next Story
“माझ्या संसारात तिचा…” सिद्धार्थ जाधवचा बायकोबाबत खुलासा, मुलींच्या शिक्षणाविषयीही केलं भाष्य